Leopard Viral Video: प्राण्यांचं जग हे माणसांच्या जगापेक्षा फार वेगळं आहे. आपल्याकडे बहुतांश वेळा शक्तीची धुरा काही अमुक लोकांकडेच सोपवल्याचे दिसते पण प्राण्यांमध्ये कोण कधी कुठे व कशी कोणावर बाजी मारून जाऊ शकतो याचा अंदाजही बांधता येत नाही. जो वेळेला हुशारी दाखवतो तोच जगू शकतो असा धडा देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय वन्यविभाग अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. यामध्ये एका प्राण्यावर तब्बल तीन बिबटे हल्ला करतात पण तो प्राणी फक्त वाचतच नाही तर अगदी हुशारीने या बिबट्यांनाच सळो की पळो करून सोडतो. नेमकी ही लढाई आहे तरी काय हे पाहूया…
तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता की दोन मोठे बिबटे आपल्या टोकदार तीक्ष्ण दातांनी हनी बेजर नावाच्या प्राण्यावर हल्ला चढवतात. तेवढ्यात एक आणखी मोठा बिबट्या तिथे येतो व आधी काही वेळ हल्ला करण्याची संधी मिळेपर्यंत वाट पाहतो. हनी बेजर काही केल्या या हल्ल्यातून वाचणार नाहीच असा अतिआत्मविश्वास असल्याने बिबट्या काही वेळाने अगदी मजा घेत त्या प्राण्याला डिवचत असतात.
पण इतक्यात वेळ अशी काही बदलते, की हनी बेजर एकाच झटक्यात स्वतःला सोडवून घेतो. त्यावेळेस तिसरा बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो पण तोपर्यंत हनी बेजर खूपच चिडलेला असतो त्यामुळे तो एक एक करत तिघांचेही हल्ले उडवून लावतो. बिबट्या त्या प्राण्याच्या पाठीवर चावा घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येक हल्ला त्याच्यावरच उलटत राहतो व शेवटी बिबट्यांनाच पळ काढावा लागतो .
Video: तू बिबट्या असशील घरचा पण मी…
हे ही वाचा<< आईची चिडचिड बघून २ वर्षाच्या मुलाने इतकी गोड समजूत काढली की…Video बघून म्हणाल, “बाळा खूप पुढे…”
कोण आहे हनी बेजर? (What Is Honey Badger)
भारतीय वन्यसेवा अधिकारी (आईएफएस) सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यावर आतापर्यंत याला २५ हजाराहून अधिक व्ह्यूज, लाईक्स मिळाल्या आहेत. हनी बेजर हा एक लढवैय्या प्राणी आहे. त्याची त्वचा ही जाड व सैल असते त्यामुळे त्याची मान जरी धरली तरी त्याच्यावर लगेच परिणाम होत नाही. तो तेव्हाही लढू शकतो. इतकंच नव्हे तर या प्राण्याची त्वचा सापाचे विष व विंचवाच्या दंशापासूनही सुरक्षित असते.