Girl Wearing Bikini In Metro Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे, यामध्ये एक तरुणी चक्क बिकिनी घालून मेट्रोमध्ये प्रवास करत असल्याचे दाखवले आहे. आजवर स्त्री सक्षमता, महिलांना आवडीनुसार कपड्यांचे स्वातंत्र्य या विषयावरून पुढाकार घेणारी मंडळी सुद्धा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत आहे. प्राप्त माहितीनुसार ही महिला दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामाजिक कार्यकर्त्या बरखा त्रेहान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, “हे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असेल तर आमच्या तरुण पिढीच्या मुली अशा सशक्तीकरणाचा बळी ठरू शकतात. निर्लज्ज स्त्रीवाद्यांना नेमके हेच हवे असते.” असे म्हटलं आहे. तर यावर नेटकऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत या मुली उर्फी जावेदकडून हे धडे घेऊन हे वागत आहेत. उद्या त्या नग्न होऊन फिरायला मागे पुढे पाहणार नाहीत असे म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी या तरुणीने अशा कपड्यांमध्ये प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही असे सांगितले आहे. या पूर्वी सुद्धा कपड्यांच्या नावावर एखादं रुमालाहुन लहान कापड व त्याला दोऱ्या बांधून ही तरुणी मेट्रोमध्ये चढली आहे . दर दिवशी वेगवेगळ्या रंगाची बिकिनी घालून ती मेट्रोमध्ये येते. विशेष म्हणजे अनेकजण तिला बघून आपापसात चर्चा करतात पण तिला थेट कधी कोणी विरोध दर्शवलेला नाही. अशा कमेंट या व्हिडीओखली पाहायला मिळत आहेत.

बिकिनीमध्ये मेट्रो प्रवास (Video)

हे ही वाचा<< बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा! बाळ समोर असताना… Video पाहून लोकं म्हणतात “अटक करा”

दुसरीकडे काहींनी हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याला सुद्धा सुनावले आहे. त्या मुलीच्या परवानगीशिवाय तुम्ही असा व्हिडीओ पोस्ट कसा करू शकता असेही काहींचे म्हणणे आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? याला स्वातंत्र्य म्हणावं की स्वैराचार हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video metro train girl wearing tiny bikini half naked in public shameless people will go nude due to urfi viral today svs