Miss Universe Winner Crowning Video: USA च्या आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने ७१ व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले आहे. गॅब्रिएलच्या रूपात जगाला नवी मिस युनिव्हर्स मिळाली आहे. १५ जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिव्हर्स किताब जाहीर करण्यात आला. भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले. अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मिस युनिव्हर्सचा निकाल जाहीर करतानाचा क्षण शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिस युनिव्हर्स २०२२ च्या फिनाले इव्हेंटमध्ये आर’बॉनी गॅब्रिएल क्रिस्टल गाऊनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. यासह व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल ही पहिली उपविजेती ठरली, तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ या स्पर्धेची दुसरी उपविजेती ठरली. यंदा भारताचे प्रतिनिधित्व कर्नाटकच्या दिविता राय हिने केले. ८० हून अधिक स्पर्धकांनी मिस युनिव्हर्स २०२२ च्या विजेतेपदासाठी स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारताच्या दिविताने टॉप १६ मध्ये स्थान मिळवले.

जगाला मिळाली ७१वी मिस युनिव्हर्स

२०२१ मध्ये जवळजवळ दोन दशकांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब भारतात परत आणणारी हरनाझ संधू, सुद्धा अत्यंत सुंदर गाऊनमध्ये दिसली. हरनाझने तिच्या उत्तराधिकारी ठरलेल्या आर’बोनी गॅब्रिएलला मुकुट घातला, महाअंतिम सोहळ्यात हरनाझने स्टेजवर हजेरी लावताना पारंपारिक लेहेंगा देखील घातला होता

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video miss universe 2022 is rbonney gabriel from usa harnaz sindhu crowning moment what did indias divitaa rai get svs