Model On Fire Viral Video: फॅशन वीकमधील अनोखे प्रयोग नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. काही डिझाइनर आपल्या भन्नाट कपड्यांनी तर काहीजण रॅम्पवर केलेल्या जादुई प्रयोगांनी चर्चेत येतात. अलीकडेच बेला हदीदच्या स्प्रे-ऑन ड्रेसने फॅशन जगतात लोकांना पार वेड लावलं होतं. आता तर त्याहून भारी असा प्रयोग पॅरिस फॅशन वीकमध्ये करण्यात आलाआहे .

पॅरिस फॅशन वीकच्या हेलियट एमिलच्या फॉल/विंटर २०२३ शोमध्ये, एका मॉडेलने कपड्यांना आग लावूनच रॅम्पवर प्रवेश घेतला होता. सैल हुड असलेले जॅकेट, झिपर अॅक्सेंट असलेली फ्लेर्ड पॅंट, शूज आणि एक लहान बॉक्स बॅग असा तिचा पोशाख होता, ज्यातील काही भागांना आग लावलेली होती. मॉडेलचा चेहरा लपवलेला होता. हेलियट एमिलने त्यांच्या सोशल मीडियावर या रॅम्प वॉकचा व्हिडिओ शेअर केला आहे. NY पोस्टच्या माहितीनुसार, शो चे कर्मचारी बाजूला अग्निशामक सुविधांसह तत्पर उभे होते.

Video: आगीच्या ज्वाळांचे कपडे आणि मॉडेलची एंट्री..

हे ही वाचा<< बाई काय हे टॅलेंट? महिलेने १८० डिग्रीमध्ये फिरवली मान, Video पाहून तुम्हीच डोकं धराल

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर या व्हिडीओचे मीम्स बनवले आहेत. तुम्ही जेव्हा भांडण जिंकून बाहेर पडता पण तुमचा पारा तापलेला असतो तेव्हा अशी स्थिती होते हे मीम तर लोकांना प्रचंड आवडले आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून अशाच भन्नाट कमेंट्स सुचत असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

Story img Loader