सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे तर काही आपल्याला अचंबित करणारे असतात. असाच अचंबित करणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड मांजरीच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये एक मांजर शांत बसलेले असताना, समोरून एक माकड त्या मांजरीजवळ जात असल्याचे दिसते. माकड मांजरीजवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, इतकेच नाही तर मांजरीला मिठीदेखील मारतो. हे दृश्य पाहून तुम्हीही अवाक व्हाल. यावर मांजरीने काय प्रतिक्रिया दिली पाहा.
आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओमध्ये मांजर आणि माकडामधील अनोखी मैत्री दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला ३८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला असून, या अनोख्या मैत्रीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.