Building Collapsed China Video: टर्कीतील भीषण भूकंपाच्या मालिकेनंतर काल, २३ फेब्रुवारीला चीन आणि तजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूंकपाची तीव्रता अनुक्रमे ७.३ आणि ६.८ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. यूएस जिऑलिजकल सर्वेनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास हे भूकंप झाले होते. या भूकंपानंतर आता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ मध्ये भूकंपाची भीषणता पाहायला मिळत आहे. दरम्यान एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये चीनमधील २० हुन अधिक गगनचुंबी इमारती कोसळताना दिसत आहेत. या बिल्डिंग काही सेकंदात पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोलमडून पडतात. हे पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी ही चीनमधील अर्धवट बांधलेली बिल्डिंग असल्याचे म्हंटले आहे. अधिकाऱ्यांनीच ही बिल्डिंग सुरुंग लावून पाडल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. या इमारती सुरक्षित नसल्याचे सांगून पाडण्यात येत आहे. अलीकडेच भारतात सुद्धा नोएडा मधील ट्वीन टॉवर सुद्धा अशाच प्रकारे पाडण्यात आला होता.
Video: १ मिनिटात २० इमारती कोसळल्या..
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘चौथ्या सीटचा’ नियम नेमका काय आहे? कुणी विचारलं तर थेट द्या ‘हे’ उत्तर
दरम्यान, हा व्हिडीओ @fasc1nate या युजरने शेअर केला होता. या व्हिडिओवर आतापर्यंत १. २ कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून चीनच्या सरकारवर टीका केली आहे. इतके पैसे लावून बांधलेल्या बिल्डिंग पाडण्याला काय अर्थ आहे, बिल्डिंग बांधण्याआधीच सुरक्षेच्या नियमांविषयी अभ्यास केलेला नव्हता का? तुम्ही खेळण्यासारखे पैसे वाया घालवत आहात असेही काहींनी म्हंटले आहे.