Viral Video: प्रत्येक लेकरासाठी त्याच्या बालपणी त्याचे आई-वडील जितके महत्त्वाचे असतात, तितकेच त्याच आई-वडिलांसाठी त्यांच्या म्हातारपणी मुलं महत्त्वाची असतात. आई नऊ महिने कळा सोसून आपल्या मुलांना जन्म देते, हे सुंदर जग दाखवते; तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, लहानपणापासून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपण जे दु:ख भोगलं, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण देतात. मुलं मार्गी लागली की, त्यांची लग्नं लावून देतात. परंतु, एकदा मुलांची लग्नं झाली की, अनेक कारणांवरून मुलं आणि आई-वडिलांमध्ये वाद सुरू होतात. अनेकदा हे वाद मारहाणीपर्यंतही पोहोचतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
लग्न झाल्यावर आपल्याला आईसारखी सांभाळून घेणारी सासू मिळावी, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्याप्रमाणेच त्या सासूलाही तिच्या लेकीसारखी जीव लावणारी सून मिळावी, असं वाटत असतं. पण, कधी कधी घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचतात. आईसारखी सासू सुनेचा छळ करते; तर कधी मुलीसारखी वाटणारी सून सासूचा छळ करते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतहीअसंच काहीसं दृश्य पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये बेडवर सासू बसली असून, तिच्यासमोर सूनही बसली आहे. यावेळी सून कोणत्या तरी गोष्टीवरून सासूला जाब विचारते, सासूच्या पायांवर फटके मारते आणि नंतर तिच्या पायाला चावतेही. यावेळी सासू ढसाढसा रडायला सुरुवात करते. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jat_chhoti या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “किती नालायक बाई आहे”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “स्त्री म्हणायच्या लायकीची नाही”. तिसऱ्यानं लिहिलंय, “हिला कठोर शिक्षा व्हायला हवी”.