Bike Jugaad Viral Video Mumbai Rains: मागील आठवड्यापासून मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. श्रावणाची चाहूल लागताच पावसाचा वेग सुद्धा काही प्रमाणात मंदावला आहे. हा पावसाचा ब्रेक आपण काही उपयुक्त कामांसाठी वापरून घ्यायला हवा. हाच विचार डोक्यात ठेवून या व्हायरल व्हिडिओमधील दादाने पावसाळ्यात बाईक चालवणाऱ्यांना येणाऱ्या मोठ्या त्रासावर उपाय शोधून काढला आहे. पाऊस आणि बाईकवरून भटकंती हे कॉम्बिनेशन कितीही मनमोहक वाटत असलं तरीही बाईक चालवताना डोळ्यात जाणारी धूळ, वारा यामुळे अक्षरशः हैराण व्हायला होतं. काही वेळा पाण्याचे टपोरे थेंब डोळ्यात जातात चेहऱ्याला लागतात यामुळे बाईक चालवताना कित्येकदा संतुलन बिघडून अपघातही होऊ शकतो. यावरच या दादाने भन्नाट जुगाड तयार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरंतर, बाईक चालवताना गॉगल जरी घातला तरी हाताला, चेहऱ्याला पावसाची जोरात आलेली सर झोडून काढते. हेल्मेट घालावं (त्याला पर्याय नाहीच) पण त्यातही कित्येकवेळा काचेवर पाण्याचे थेंब साचतात. अशावेळी सहज लक्ष विचलित होऊ शकतं. हेच टाळण्यासाठी या हुशार तरुणाने गाडीच्या पुढे चक्क काचेसारखी शीट लावली आहे. एवढंच नाही तर डोक्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा वर छप्पर तयार केलं आहे. हा जुगाड पाहून अनेकांनी या तरुणाला १०० पैकी १०० मार्क दिले आहेत.

Video: बाईक चालवताना डोळ्यात पावसाचं पाणी जातं म्हणून लावलं डोकं

हे ही वाचा<< आईच्या बॉयफ्रेंडने लेकींना गोदावरीच्या पुलावरून ढकललं पण तितक्यात.. पहाटे ४ वाजताचा थरार वाचून व्हाल थक्क

दरम्यान तब्बल २३ हजार लाईक्स असलेल्या या व्हिडिओवर काहीही कमेंट करून यावर आता फक्त एक वायपर लावला की सगळा त्रास संपेल असं म्हटलं आहे. तर काहींनी या प्लॅस्टिकवर जर पाणी साचलं तर काय करणार असा प्रश्न केला आहे. यासाठी खरंतर आपणही अर्धा बटाटा वापरून एक भन्नाट जुगाड सुद्धा करू शकता. तो ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा. बाकी तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुम्हाला हा जुगाड तुमच्याही बाईकची करायला आवडेल का हे कमेंट करून नक्की कळवा.