People Doing Vulgar Act Goes Viral In Amravati: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. पश्चिमी यूपीमध्ये राजपूतांच्या घरासमोर मुस्लिम लोक शिवीगाळ आणि अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करत हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. मात्र, आमच्या तपासात हा व्हिडिओ पश्चिमी उत्तर प्रदेशातील नसून महाराष्ट्रातील अमरावती येथील असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ सुमारे १ मिनिटाचा आहे, ज्यामध्ये काही लोक नृत्य करताना अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही लोक घोषणाबाजी करतानाही दिसत आहेत. “पश्चिम यूपीमध्ये विजयानंतर, मुस्लिम लोक राजपूतांच्या घरासमोर जात आहेत, त्यांच्या माता-भगिनींना शिवीगाळ करत आहेत आणि अश्लील हावभाव करत आहेत” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Jodhapur Ward Boy Viral Video
धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी…
, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Fact Check Of Little Girl Trapped Under Rubble
ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा
Killy Paul's dance on Tera Ghata
किली पॉलचा ‘तेरा घाटा’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश

तपास:

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी न्यूजचेकरने व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. यावेळी व्हिडीओमध्ये अंबानगरी लिहिलेला मोठा लोगो दिसला.

Google वर संबंधित कीवर्ड शोधल्यानंतर आम्हाला आढळले की हे ठिकाण महाराष्ट्रातील अमरावती शहरात आहे. यावेळी, आम्हाला गुगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये व्हायरल व्हिडिओचा लोगो देखील दिसला. आपण ते इथे पाहू शकता.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अमरावती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात २५ जणांविरुद्ध आयपीसी २९४ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ७ जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याचे वक्तव्यही व्हिडीओमध्ये आहे.

याप्रकरणी आम्ही अमरावतीच्या कोतवाली पोलिस ठाण्यातही संपर्क साधला. हा व्हिडीओ अमरावतीचा असून याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्हायरल व्हिडीओमध्ये अर्वाच्य भाषेत शिवीगाळ असल्याने बातमीत दिलेला नाही, मात्र आपण इथे क्लिक करून पाहू शकता.

हे ही वाचा<< “मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

निष्कर्ष: आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडीओ पश्चिमी उत्तर प्रदेशातील नसून अमरावतीचा आहे.

अनुवाद: अंकिता देशकर

सौजन्य: न्यूजचेकर

(ही कथा मूळतः न्यूज चेकरने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)