Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी हे लहान मुलं डान्स करताना दिसतात तर कधी हे लहान मुलं गाणी म्हणताना दिसतात. अनेकदा पालक कौतुकाने त्यांच्या मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अनेकदा लहान मुलांचा गोड संवाद ऐकताना मजा येते. नेटकरी सुद्धा अशा व्हिडीओवर भरभरून प्रतिसाद देतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई चिमुकलीबरोबर संवाद साधताना दिसते. या संवादादरम्यान चिमुकली असं काही बोलते की तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हेही वाचा : ‘एक्सप्रेशन्स असावे तर असे…’ ट्रेनमध्ये भेळ विकणाऱ्या महिलेची ॲक्टिंग पाहा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

आई : माहिका तुला अंघोळ कोण घालतं?
चिमुकली : मम्मा
आई : तुझे केस कोण विंचरतं?
चिमुकली : मम्मा
आई : तुला जेवण कोण भरवतं?
चिमुकली : मम्मा
आई : तुला फिरायला कोण नेतं?
चिमुकली : मम्मा
आई : तुला झोपवतं कोण?
चिमुकली : मम्मा
आई : तुला आवडतं कोण?
चिमुकली : डॅडा
आई : कोण आवडतं?
चिमुकली : डॅडा आवडतो.
आई : सगळं मी करणार आणि आवडतं कोण?
चिमुकली : डॅडा..
आई : का आवडतं?
त्यावर चिमुकली फक्त “डॅडा” “डॅडा” म्हणताना दिसते.
शेवटी चिमुकलीची आई तिला “कट्टी” म्हणते.

मायलेकीचा हा गोड संवाद चेहऱ्यावरून हसू आणेल. काही लोकांना त्यांचे बालपणीचे दिवस आठवेल.

हेही वाचा : VIRAL VIDEO : ‘हा तर रायडर!’ गॉगल लावून, जॅकेट घालून मालकाबरोबर ऐटीत बसला गाडीवर; श्वानाच्या लूकवर नेटकरीही फिदा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

mahikamoments या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “जेव्हा आई सर्वकाही करते पण तरीसुद्धा…”

हेही वाचा : PHOTO: “पगाराचा अकडा आणि जमिनीचा तुकडा…” सिंगल मुलांसाठी खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “खरं आहे भाऊ”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माहिकाचे चाहते आता तिच्या बाबांचे चाहते झाले” तर एका युजरने लिहिलेय, “वडिलांची राजकुमारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “तो शेवटचा “डाडा” जखमेवर मीठ चोळणारा होता” एक युजर लिहितो, “म्हणूनच मला मुलगी हवी आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader