PM Narendra Modi Delhi Metro Visuals: मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेली दिल्ली मेट्रो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शुक्रवारी दिल्ली विद्यापीठात पोहोचण्यासाठी मोदींनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा या समारंभाचे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्ली मेट्रोमधील पंतप्रधानांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेट्रोमध्ये एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवाशांशी संवाद साधत असल्याचेही दिसून आले आहे. शुक्रवारी दिल्ली विद्यापीठात पंतप्रधान मोदी टेक्नॉलॉजी फॅकल्टी, कॉम्प्युटर सेंटर आणि एक शैक्षणिक ब्लॉक अशा तीन इमारतींची पायाभरणी करतील आणि कॉफी टेबल बुक्सच्या सेटचे प्रकाशन करणार आहेत.

Video: मोदींचा दिल्ली मेट्रोने प्रवास

मोदींवर नेटकऱ्यांचे टीकास्त्र

दरम्यान, मोदींच्या दिल्ली मेट्रो प्रवासाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी याला पीआर स्टंट म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “तुमच्यासाठी प्रवाशांना थांबवून मेट्रो रिकामी करावी लागली असणार, स्टेशनवर गर्दी तर दिसतच नाही म्हणजे एकूण तुमचा हा स्टंट करायला प्रवाशांची कोंडी झाली असणार यात शंका नाही” अशा अनेक कमेंट या पोस्ट खाली दिसत आहेत. तर काहींनी मोदींनी ज्या प्रवाशांशी गप्पा मारल्या ते प्रवासी सुद्धा पैसे देऊन बोलवून आणले असणार असे अंदाज बांधले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video narendra modi enters delhi metro modi brutally trolled for travelling saying people had to suffer for this paid pr svs