Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हैदराबादच्या कुशाईगुडा-नागाराम रस्त्यावर शनिवारी रात्री सुमारे २५ बाईकचा अपघात झालाय. एका ऑईल टँकरचे इंधन गळती झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती यावेळी या रस्त्यावरुन येणाऱ्या गाड्यांचे एकामागोमाग भयंकर अपघात झाले. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर तेल सांडलं आहे आणि लांबून येणाऱ्या बाईक्सना याचा अंदाज नसल्यानं त्या रस्त्यावरुन एका मागोमाग घसरत आहेत. हे भीषण अपघात एक दोन बाईक्सचे नाहीतर तब्बल २५ बाईक्सचा या रस्त्यावर अपघात झाला आहे. याचा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जखमी झालेले लोक रस्त्याच्या एका बाजूला उभे राहून कळवळत आहेत. तर संपूर्ण रस्त्यावर बाईक्स पडलेल्या दिसत आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

वाहतूक वळवली, रस्त्यावर वाळू आणि भुसा टाकला

इंधन गळतीची घटना लवकरच आवश्यक कारवाईसाठी जवळच्या पोलिस स्टेशनला कळवण्यात आली. मात्र, गजबजलेल्या रस्त्यावरील साफसफाई करण्यासाठी पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच काही दुचाकी वाहने या मार्गावरून गेली आणि घसरली. दरम्यान काही वेळानं इंधन सांडलेल्या रस्त्यावर भूसा आणि वाळू फवारण्यात आली. काही वेळाने शहरातील कुशाईगुडा-नागाराम रस्त्यावर नियमित वाहतूक सुरू झाली. दरम्यान इंधन टँकर चालकाची ओळख पटलेली नाही. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र जीएचएमसीच्या डीआरएफ टीम आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “त्या प्रवाशांनी मरण पाहिलं” फेंगल चक्रीवादळामुळे विमान हवेतच तिरकं झालं अन्… ३२ सेकंदांचा धडकी भरवणारा VIDEO

सोशल मीडियावर हा अपघातांचा व्हिडीओ @MohammedBaleeg2 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत टँकर चालकाला लवकरात लवकर अटक करुन त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत आहे.