Neeta Ambani- Mukesh Ambani Wedding: नीता अंबानी व मुकेश अंबानी यांची जोडी अनेकदा चर्चेत असते. रिलायन्सचं हे पॉवर कपल एक आदर्श जोडपं म्हणूनही पाहिलं जातं. सध्या नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा खूप व्हायरल होत आहे. लेकाच्या लग्नाची मागणी घालण्यासाठी धीरूभाईंनी जेव्हा कॉल केला होता तेव्हा आपल्याला काहीश्या गैरसमजुतीमुळे रागच आला होता असे नीता अंबानी यांनी सांगितले आहे. हा किस्सा ऐकून नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये “बापरे मला असा कॉल आला तर मी उड्याच मारल्या असत्या”, “मला सुद्धा असा एखादा कॉल यायलाच हवा अशा कमेंट्स केल्या आहेत” नेमकं असं तेव्हा काय घडलं होतं हे पाहूया…

व्हायरल व्हिडिओमध्ये नीता अंबानी सांगतात की, “ऑक्टोबरच्या मध्यात मला एक कॉल आला मी तेव्हा माझ्या परीक्षांचा अभ्यास करत होते. कॉल उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने आपण धीरूभाई अंबानी बोलत आहोत असे सांगितले. मला वाटलं हा कोणीतरी प्रॅन्क करतंय म्हणून मी फोन ठेवून दिला, परत थोड्यावेळाने मला असाच कॉल आला, मी पुन्हा उचलला आणि नाव ऐकून त्या व्यक्तीला प्लीज त्रास देऊ नका असे सांगून ठेवून दिला. तिसऱ्यांदा कॉल आला तेव्हा मला जरा रागच आला होता म्हणून मी फोन उचललाच नाही. पण माझ्या बाबांनी कॉल घेतला आणि काहीच सेकंदात त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. त्यांनी मला सांगितलं की “हे खरंच धीरूभाई होते आणि त्यांना माझ्याशी बोलायचं होतं, त्यामुळे बाबा म्हणाले तू जरा नीट आदराने बोल”

नीता अंबानी Video

हे ही वाचा<< अनंत अंबानीच्या फिटनेस ट्रेनरचे मानधन ऐकून व्हाल थक्क! १०८ किलो वजन कमी करताना दिला होता ‘असा’ डाएट

दरम्यान, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लोकांनी नीता यांच्या विनम्रतेचे आणि बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे. यातून त्यांचा उच्च क्लास दिसून येतो असेही काही जण म्हणाले आहेत. तर काहींनी मला मन्नत मधून कधीतरी असा कॉल यायला हवा अशी इच्छाही मजेशीर पद्धतीने कमेंट केली आहे. या व्हिडिओला तब्बल २ लाख व्ह्यूज असून कमेंट करणाऱ्या अनेकांनी ईशा अंबानी पूर्ण आईसारखीच दिसते असेही म्हटले आहे.

Story img Loader