झपाट्याने बदल होणाऱ्या या जगामध्ये, खाद्यसंस्कृतीमध्येदेखील फार वेगाने बदल होताना आपण पाहत आहो. नवनवीन पदार्थांच्या निर्मितीपासून, अस्तित्वात असणाऱ्या पदार्थांमध्ये बदल करण्याचा सध्याचा ट्रेंड आहे असे म्हटले तरीही चुकीचे ठरणार नाही. अशातच, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खूप वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी पाहत असतो. अशीच अंडा भुर्जीची एक भन्नाट रेसिपी सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. गंमत म्हणजे ही अंडा भुर्जी, शुद्ध शाकाहारी व्यक्तीदेखील खाऊ शकतो! अरेच्चा असं कसं काय? पडला ना प्रश्न… मग हे कसं शक्य आहे ते पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध यूट्यूब आणि इन्स्टाग्राम ब्लॉगर अमर सिरोही याने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @Foodie_Incarnate या अकाउंटवरून या बिना अंड्याच्या अंडा भुर्जीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला “१०० टक्के शुद्ध शाकाहारी अंडा भुर्जी” असे कॅप्शन देण्यात आले असून, या भन्नाट रेसिपीने नेटकऱ्यांचेदेखील चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये ही भुर्जी नक्की कशी बनवली आहे ते पाहा.

हेही वाचा : ‘या’ देशात विकली जाते चक्क ‘गुलाबजाम कॉफी’! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ….

या व्हिडीओमध्ये एका महिलेने सर्वप्रथम तव्यावर तेल तापवले. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आले असे सर्व पदार्थ घालून परतवून घेतले. त्यानंतर यामध्ये व्हीगन [vegan- प्राण्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कोणत्याही उत्पादनांचा ज्यामध्ये समावेश नसतो असे] स्क्रॅम्बल्ड अंडे घालून कांद्यासोबत छान शिजवून घेतले. सर्वात शेवटी थोडे मीठ, चिली फ्लेक्स घालून भुर्जी तयार केलेली आहे. अशी ही बिना अंड्याची अंडा भुर्जी ५० रुपयांना विकली जाते.

या व्हिडीओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, १७ हजार लाईक्सदेखील मिळाले आहेत. या भन्नाट रेसिपीवर अनेक प्रतिक्रिया आलेल्यासुद्धा दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

एकाने, “या व्यक्तीने अंडा भुर्जीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले आहे” असे म्हटले आहे. दुसऱ्याने, “हे सगळं ठीक आहे, पण अंड्याला पर्याय [substitute] नाही” असे सांगितले. तर तिसऱ्याने, “जे शाकाहारी आहेत, त्यांना कधी अंडं खावेसे वाटले नाही, ते ही भुर्जी का खातील? आणि जे मांसाहारी आहेत, ते तरी अशी अंडा भुर्जी का खाणे पसंत करतील?” असा प्रश्न विचारला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of 100 percent pure veg anda bhurji is going viral on social media check it out dha
Show comments