बाहेर जेवायला गेल्यानंतर जेवणाची सुरुवात आपण सगळ्यात पहिले स्टार्टर्सने करतो. स्टार्टर्स म्हटलं की मसाला पापड, मंचुरियन, कबाब यांसारखे केवढेतरी पर्याय आपल्याला मेन्यूवर वाचायला मिळत असले, तरीही कबाब मात्र सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. व्हेजमधील हराभरा कबाबपासून, दही कबाब, गिलोटी कबाब, सिख कबाब, रेशमी कबाब, कस्तुरी कबाब यांसारखी कितीतरी विविधता या एका पदार्थामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कबाब रेसिपीने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण घाबरू नका… यावेळेस कोणताही विचित्र प्रकार या कबाबसोबत केलेला नसून, खरंच एक वेगळी रेसिपी आपल्याला पाहायला मिळते. @nomankatiyarvlogers या अकाउंटने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून अशा भन्नाट ‘बन कबाब’चा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही बन कबाब नावाची रेसिपी जवळपास ७३ वर्षे जुनी असल्याचे समजते.

हेही वाचा : अरेच्चा! हे चक्क बिना अंड्याची, अंडा भुर्जी विकतात? चकित झालात ना? मग हा व्हिडीओ पाहा

हा व्हिडीओ पाकिस्तानमधील कराची येथील एका कबाब विक्रेत्याचा असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये सगळ्यात पहिले तो अंडी फोडून घेतो. त्यामधील पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करून घेतो. त्यानंतर अंड्याचा पांढरा भाग भरपूर वेळ मस्त फेटून घेतो. अंड्याचा चांगला फेस होऊन ते घट्ट होत नाही, तोपर्यंत विक्रेता ते अंडं फेटून घेतो. वडे बनवतो अगदी तसेच, तयार कबाब फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून, तेलामध्ये खरपूस परतून घेतो. एक बाजू परतून झाल्यानंतर, कबाब दुसऱ्या बाजूला पलटले जातात. दोन्ही बाजूने कबाब छान खरपूस झाले की ते पावासोबत खाण्यासाठी दिले जाते.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर याला ३.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच नेटकऱ्यांनी यावर भरपूर कमेंट्स केलेल्या असून, कमेंट्समध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील नेटकऱ्यांचा समावेश आहे. ‘हा पदार्थ खाऊन बघण्यासाठी नक्कीच पाकिस्तानमध्ये येऊ’, अशा अनेक भारतीयांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

हेही वाचा : अरे बापरे! आपल्याच वडिलांना ओळखणे झाले मुश्कील…; जुळ्या मुलींच्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाहा

या चविष्ट ‘बन कबाब’ पदार्थावर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.

एकाने, “अन्नपदार्थ आणि त्याच्याबद्दलचा इतिहास आणि गोष्टी ऐकायला फारच मस्त वाटतं. मलासुद्धा हे बन कबाब याक्षणी खाता आले असते तर…” असे लिहिले आहे. दुसऱ्याने, “वाह… कबाब आणि त्यामागची माहिती सर्वच खूप मस्त”, असे म्हटले आहे. तिसऱ्याने “एक दुकान भारतात पण चालू करा ना…” अशी विनंती केली आहे. चौथ्याने “हे कबाब मी १९९६ साली कराचीमध्ये खाल्ले होते आणि ते खूपच अप्रतिम होते”, अशी माहिती दिली. तर शेवटी पाचव्याने, “हा पदार्थ बंगाली कबीराजी या पदार्थासारखा दिसतो आहे”, अशी अजून वेगळी माहिती दिली. बंगालमध्ये प्रसिद्ध असलेली फिश कबीराजी हा पदार्थसुद्धा माश्याचे तुकडे फेस तयार करून घेतलेल्या अंड्यामध्ये बुडवून तळले जातात.

@nomankatiyarvlogers हा पाकिस्तान देशातील एक ब्लॉगर आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यासारखे अजून भन्नाट रेसिपी आणि पदार्थांचे व्हिडीओ पाहायला मिळतात.