Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथी संस्कृती या शहराची ओळख सांगतात. येथील ऐतिहासिक वास्तु, प्राचीन मंदिरे, गडकिल्ल्यांचा इतिहास, खाद्यसंस्कृतीची चर्चा जगभरात आहे. दरदिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात आणि येथील लोकप्रिय ठिकाणांना भेट देतात पण काही ठिकाणे अशी असतात जी खूप कमी लोकांना माहिती असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्याजवळचे एक सुंदर ठिकाण दाखवल आहे. या व्हिडीओमध्ये पांढरी शुभ्र नदी, नदी शेजारी सुंदर मंदिर आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमके आहे तरी कुठे? आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरूवातीला एक सुंदर आणि मोठी इमारत दिसेल. या इमारतीचा परिसर अतिशय सुरेख आहे. व्हिडीओमध्ये सुंदर पाण्याचा कारंजा दिसेल. मंदिराच्या शेजारी नदी वाहताना दिसते. ही नदी आणखी या मंदिराची शोभा वाढवते.मंदिराच्या आतील परिसर मोठा आहे. तेथे तुम्हाला गगनगिरी महाराजांचा फोटो दिसेल. या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. मंदिराच्या सभोताली सुंदर हिरवेगार बाग आहे. मंदिरात सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी सुद्धा तैनात केलेले दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

advitiyapune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला माहितीये का पुण्याजवळील हे सुंदर ठिकाण??” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जय जय गगनगिरी समर्थ” तर एका युजरने लिहिलेय, “गगनगिरी महाराज मठ, खोपोली” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खोपोली मध्ये आहे….जिल्हा रायगड” अनेक युजर्सनी हा हे ठिकाण पुण्यात नसून खोपोलीमध्ये असल्याचे सांगितले आहे.

हे ठिकाण पुण्याजवळून जवळपास ८० किमीवर आणि पिंपरी चिंचवडपासून जवळपास ६७ किमीवर आहे. या ठिकाणाचे नाव गगनगिरी महाराज मठ असून ते खोपोलीत आहे. तुम्ही एक दिवसाचा ट्रिप प्लॅन करत असाल तर हे ठिकाण उत्तम आहे.