Viral Video : आई वडील हे नेहमी मुलांच्या हिताचा विचार करतात. आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, चांगली व्यक्ती बनावे आणि स्वत:ची ओळख निर्माण करावी अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. आपल्या मुलांना प्रत्येक सुख मिळावे आणि त्यांच्या सर्व इच्छा, स्वप्ने पूर्ण व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटते. जेव्हा मुलांचे एखादे स्वप्न पूर्ण होते, त्यांना यश मिळते तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला पोलीस बनलेल्या मुलाला पाहून आईवडिलांच्या आनंदाला कोणताही पारावा नव्हता. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पोलीस बनलेला तरुण आईवडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Video of a boy crying on his parents shoulders as a dream come true of becoming a police officer anyone would be emotional video goes viral)

पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले! आईवडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसा ढसा रडला मुलगा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक पोलीस अधिकारी आईवडीलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना दिसत आहे. मुलाला रडताना पाहून आईवडील सुद्धा रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुमची झोप मोडली तरी चालेल पण आईवडिलांची स्वप्ने मोडली नाही पाहिजेत”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

cops__ramling__k या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान भावा” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्या व्हिडीओमध्ये मुलांना मिळालेले भरघोस यश पाहून आईवडिल भावुक झालेले दिसतात.
दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थी अपयशी ठरतात पण तरी सुद्धा विद्यार्थी हार मानत नाही.

Story img Loader