Ukhana Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही उखाणे मजेशीर असतात तर काही उखाणे थक्क करणारे असतात. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. नव्या नवरीने गृहप्रवेशाच्या वेळी अप्रतिम असा उखाणा घेतला आहे. तिच्या उखाण्यातील प्रत्येक ओळीवर घरातील लोक जल्लोष करताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ एका लगीन घरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवीन विवाहित जोडपे दिसेल जे गृहप्रवेश करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नातेवाईक आणि कुटुंबातील लोकांना त्यांचा रस्ता अडवलेला आहे आणि त्यांना उखाणा घेण्यासाठी विचारत आहे. तेव्हा सुरवातीला नवरी उखाणा उखाणा घेते.
उखाणा घेताना नवरी म्हणते, “पुरण पोळी पुरणाशिवाय काय गोड नाही
माझ्या सासूच्या साधेपणाला काय तोड नाही…
साध्या वरण भाताला तुपाशिवाय चव नाही
अख्ख्या पंचकृशीत माझ्या सासऱ्यांएवढा कोणाला मान नाही…
सणासुदीला वाढते आमरस आणि पुरी
जीवाला जीव देणारी माझी नणंदबाईंच खरी…
खीरीत खीर तांदळाची खीर
सर्वात रुपवान आहे माझे दीर…
बरं आता सर्वांसाठी स्वयंपाक केला
माझे नवरोबा मात्र राहिले;
काहीच नाही वाढलं म्हणून फुगून बसले..
त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी
मग काय गुलूगुलू करायला सर्वेशराव फर्स्ट क्लासमध्ये राजी…”
नवरीचा हा उखाणा नवरदेवासह इतर सर्वांना आवडतो. उखाणा ऐकून सर्व जण जल्लोष करताना दिसतात.
पुढे नवरेदवाला सुद्धा उखाणा घेण्याची विनवणी करतात तेव्हा नवरदेव सुद्धा उखाणा घेतो. नवरदेव उखाणा घेताना म्हणतो, “आता विसरावी लागेल सवय, काढा लागेल सॉक्स
सायली घेते ऑन दी रॉक्स” नवरदेवाचा उखाणा ऐकून सर्व जण एकच जल्लोष करतात. सध्या नवरीनवरदेवाचा हा उखाण्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल

उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेऊन उखाणा घेतला जातो. कोणत्याही शुभ प्रसंगी विशेषत: लग्नसमारंभात आवडीने उखाणा घेतला जातो. या उखाण्यातून कधी जोडीदाराविषयी प्रेम तर कधी काळजी किंवा जिव्हाळा किंवा आपुलकी दिसून येते. हल्ली सोशल मीडियावर अनेक क्रिएटिव्ही दाखवून उखाणे घेतले जातात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : भर लग्न मंडपात पंडितजींचा राग अनावर; नवरदेवाच्या मित्रांबरोबर केलं असं काही की…; VIDEO पाहून सांगा हे योग्य आहे का?

sawant_heramb या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उखाण ऐकताय ना !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फसक्लास जोडीला फसक्लास शुभेच्छा!” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम भारीच” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “एक नंबर..सगळ्यांना मस्का लावला
नव्याचे नऊ दिवस” एक युजर लिहितो, “नवरीचा सर्वोत्तम उखाणा. सहजतेने ती कुटुंबासाठी सुंदर शब्द म्हणाली. हे दुर्मिळ आणि विचारशील आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.