निसर्गाचे गूढ आजवर कोणीही उकळू शकलेलं नाही. निसर्ग दररोज आपल्याला आश्चर्याचे नवनवीन धक्के देत असतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल, मात्र निसर्गाच्या माध्यमातून त्या आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे प्राण्यांचे साम्राज्यही आश्चर्याने भरलेले आहे. बर्‍याच प्रजातींमध्ये अद्वितीय आणि विलक्षण क्षमता असतात ज्या त्यांना केवळ भक्षकांशी लढण्यास मदत करत नाहीत तर प्रतिकूल परिस्थितीत त्यांना सुरक्षितही ठेवतात. असाच एक प्राणी म्हणजे, ऑक्टोपस, जे खोल समुद्रात राहतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ऑक्टोपसची त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलण्याची अविश्वसनीय क्षमता आपण पाहू शकतो. वंडर ऑफ सायन्सने ट्विटरवर पोस्ट केलेला, २३ सेकंदाचा व्हिडीओ सेफॅलोपॉडला समुद्रामध्ये फिरताना आणि सभोवतालच्या जीवजंतूंनुसार त्याच्या त्वचेचा रंग बदलताना दाखवतो. हा ऑक्टोपस जमिनीवर स्थिर होईपर्यंत आणि तो स्वतःला सीशेल सारख्या पदार्थात बदलेपर्यंत कॅमेरा त्याच्या आजूबाजूला फिरतो.

‘काय डोंगार… काय झाडी…’; ‘या’ कंपनीचं संपूर्ण टीमसह दोन आठवडे वर्क फ्रॉम बाली

या व्हिडीओ कॅप्शनमध्ये निक रुबर्गला श्रेय देण्यात आलं असून हा व्हिडीओ २.३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मूलतः व्हायरल हॉगद्वारे २०१६ ला पोस्ट केलेला हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. ट्विटर वापरकर्ते ऑक्टोपसच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर पूर आला.

लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

“ते फक्त रंगच बदलत नाही तर त्याच्या देहाचा पोत बदलतो? कसा?” एका वापरकर्त्याला विचारले. “आश्चर्यकारक! ही खरी मिस्टिक आहे,” दुसर्‍याने एक्स-मेन कॉमिक पुस्तकांमधील लोकप्रिय पात्राचे चित्र पोस्ट करत म्हटले.

ऑक्टोपस नेहमीच त्यांच्या मोठ्या डोक्याने आणि पायांनी सर्वांना आश्चर्यचकित करतात. काही वर्षांपूर्वी, इंद्रधनुष्याच्या रंगाच्या “ब्लँकेट ऑक्टोपस” च्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

Story img Loader