Video Of Mother Beating Son Goes Viral: एक आई आपल्या मुलावर निस्वार्थी प्रेम करते. असं म्हणतात की, ती आपल्या मुलाला संकटात पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल वाचून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. यात जन्मदात्या आईने आपल्या लहान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आई आपल्या मुलाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका क्रूर आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो आपल्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती महिला चिमुरड्याच्या छातीवर बसून मुलाला अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. ही महिला त्या मुलाच्या छातीवर बसून त्याचं डोकं जमिनीवर आपटतेय, मध्येच त्याचा गळा दाबतानाही दिसतेय. मूल स्वतःला वाचवण्याची विनवणी करत आहे, रडत आहे, आईकडे जीवाची भीक मागत आहे. मुलगा वारंवार पाणी मागताना दिसत आहे, पण आईचं हृदय तरीही पिघळत नाही. पण, आईला त्या मुलाची अजिबात कीव येत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
Delhi triple murder case update
तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child recreated the scene from the Kantara movie
काय चूक होती त्याची? ‘कांतारा‘ सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

ही घटना उत्तराखंडमधल्या रुडकी इथल्या झबरेडा इथली आहे. व्हायरल व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी उत्तराखंड पोलिस जेव्हा महिलेकडे पोहोचले तेव्हा सत्य समजल्यानंतर अधिकारीही चकित झाले. या घटनेवर कठोर कारवाई करायची की महिलेला पीडित समजून तिला मदत करायची, हे त्यांना समजले नाही.

(हे ही वाचा : विमान हजार फूट उंचीवर पोहोचले अन् दरवाजाच तुटला, ५०० प्रवाशांचा जीव टांगणीला, पुढे घडलं असं की…, घटनेचा फोटो व्हायरल )

व्हिडीओवर महिलेची प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पतीसोबत गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू असून पती घरी राहत नाही आणि पैसेही पाठवत नाही. बराच काळ तो घरी आलेला नाही. दुकानात काम करून ही महिला केवळ घरखर्च भागवते. पतीला घाबरवण्यासाठी आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने आपल्या मोठ्या मुलासोबत हा व्हिडीओ बनवला होता आणि दोन महिन्यांपूर्वी पतीला पाठवला होता, त्यानंतर तिच्या पतीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेने सांगितले की, मारहाणीदरम्यान तिने मुलाच्या छातीवर डोके ठेवण्याचे नाटक केले होते, परंतु मुलाला चावा किंवा दुखापत केली नाही.

व्हिडीओवर पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांची प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. व्हायरल व्हिडीओवर पोलिसांनी सांगितले की, महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. तिचा पती घरी येत नाही किंवा तिला राहण्याचा खर्चही देत नाही, अशा परिस्थितीत पतीला घाबरवण्यासाठी महिलेने आपल्याच मुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून पतीला पाठवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, हा व्हिडीओ दोन महिन्यांचा आहे. महिला आणि बालकांचे ‘पहिल्या टप्प्यातील समुपदेशन’ केले जात आहे. कोणत्याही दिवशी महिलेच्या घरी जाऊन मुलाची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे झाब्रेडा पोलिसांचेही या प्रकरणावर लक्ष आहे. महिलेच्या पतीची बाजूही तपासली जात आहे.

येथे पाहा व्हिडीओ

पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी या निर्दयी आईवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader