Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ खूप भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. बापलेकीचा हा व्हिडीओ पाहून कोणालाही अश्रु आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मृत्युशी झुंज देत असलेल्या तिच्या वडिलाशी भावनिक संवाद साधताना दिसते. बापलेकीमधला हा संवाद कदाचित तुम्हाला रडवेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (video of a daughter crying and talking emotionally with father who is fighting for life in a hospital video goes viral)
बापलेकीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. एका मुलीसाठी तिचे वडिल सुपरहिरो पेक्षा कमी नसतात तर एका वडिलासाठी त्याची मुलगी आईसमान असते. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेल्या तिच्या वडिलाशी संवाद साधताना दिसते. तिचे वडिल मृत्युशी झुंज देत आहे पण तरीसुद्धा ही चिमुकली वडिलांना धीर देताना दिसते.
व्हिडीओमध्ये चिमुकलीचा एकतर्फी संवाद दाखवला आहे. पप्प मी जाऊ का.. पप्पा मी जाऊ का.. पप्पाजी तुम्ही काही खाता का पण वडिल काहीच उत्तर देत नाही हे पाहून ती निराश होते. त्यानंतर एक महिला कदाचित त्या चिमुकलीची आई असावी, ती चिमुकली सांगते आणि ते ऐकून चिमुकली वडिलांना म्हणते, पप्पा तुम्ही लवकर बरे व्हाल तर.. ” व्हिडीओमध्ये नीट ऐकू येत नाही ती नेमकं काय बोलते पण चिमुकली वडिलांना असे पाहून खूप भावुक होताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणालाही रडू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
mustaqeem.ahmed.31149 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुलगी किती समजूतदार आहे. परवानगीशिवाय जात नाही” तर एका युजरने लिहिलेय, “देवा कोणत्याच मुलीला असा दिवस दाखवू नको” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून अश्रु आवरले नाही. मला एक लहान मुलगी आहे जी माझी खूप काळजी घेते” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी देवाला प्रार्थना करतो की तुझे वडिल लवकर बरे होईल.” अनेक युजर्सनी या चिमुकलीचे वडिल लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. काही युजर्सनी बापलेकीच्या नात्याविषयी आपले अनुभव व्यक्त केले आहेत.