viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लग्नातील प्रथा, परंपरा, पारंपारिक चालीरीती, डान्स, गाणी, उखाणे इत्यादी गोष्टींचे व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी मंडपात हटके एन्ट्री करताना दिसत आहे. त्यांची एन्ट्री पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर नवरदेव नवरीच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. पण व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेव नवरी लग्नाच्या मंडपात येताना दिसताहेत. दोघेही चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करत नाही तर भजनाच्या तालावर टाळ वाजवत नृत्य करताना दिसत आहे. नवरदेव नवरी या दोघांच्या हातात टाळ आहे. छोटे चिमुकले वारकरी टाळ वाजवत आणि नृत्य करत त्यांचे स्वागत करताना व्हिडीओत दिसत आहे. हा भक्तीमय व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा भक्तीमय व्हिडीओ एका लग्नातील आहे. या जोडप्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली दिसत आहे. वारकरी घरातील लग्नाचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. वारकरी संप्रदाय हा भगवान विठ्ठलाला समर्पित असलेला भक्तांचा संप्रदाय आहे. हे लोक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला जातात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
sheetals_makeup_artist and 2 others या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “नवरी एकदम वारकरी घरातली आज वाटतंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुपच छान छान सुरवात केली नवीन संसाराची” एक युजर लिहितो, “खूप छान परंपरा. राम कृष्ण हरी” तर एक युजर लिहितो, “खूप छान, अप्रतिम. भारतीय संस्कृतीच अप्रतिम दर्शन” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.