सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अपघाताचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच थक्क व्हायला होतं. असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ आॅटो, बाईक, कार अपघाताचा आहे. आता गाडीचा अपघात म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तर चालकानं कोणाला तरी ठोकलं असेल किंवा एखाद्या भिंतीला वगैरे धडक दिली असेल. परंतु असा अपघात नक्कीच तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल. नेमके घडले काय, हे व्हायरल व्हिडीओतून नक्की पाहा, आणि सांगा यात चूक कुणाची… 

दुर्घटना कधी आणि कुठे होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे विशेषतः रस्त्यावरून चालताना तर भरपूर सतर्क राहाण्याचा नागरिकांना सल्ला दिला जातो. अनेकदा आपली चूक नसतानाही रस्त्यावर आपल्याला मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावं लागते. भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. मात्र, यातील काही घटनांमध्ये अगदी थोडक्यात मोठी दुर्घटना टळल्याचंही पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडिओ पुण्यातून समोर आला आहे. 

(हे ही वाचा: पाकिस्तानी तरुणीचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन )

अपघाताचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. प्रत्यक्षात एका कारने ऑटोला धडक दिली, ऑटोने दुचाकीला धडक दिली आणि नंतर कार उलटली. हा अपघात समजून घेण्यासाठी लोक हा व्हिडिओ एकदा नाही तर पुन्हा पुन्हा पाहत आहेत. पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे.

ही क्लिप १८ सेकंदांची आहे. यामध्ये वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने जात असल्याचे पाहायला मिळते. अचानक एका कार चालकाने ऑटो चालकाला धडक दिली. ऑटोचालकाचा तोल सुटतो आणि एका बाजूला पलटू लागतो त्यामुळे तो दुचाकीस्वाराला धडकतो. तिन्ही वाहने रस्ता दुभाजकावर आदळली. दुचाकीस्वार खाली पडतो. ऑटो थांबतो आणि कार उलटलेली दिसत आहे. हा अपघात कसा घडला, याविषयी लोकांमध्ये आता गोंधळ उडाला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ @Madan_Chikna नावाच्या हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ दोनदा पाहाल.” वृत्त लिहेपर्यंत या पोस्टला २ लाख ३६ हजार व्ह्यूज आणि आठशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी प्रतिसादही दिला. एका व्यक्तीने टिप्पणी केली, “हे कसे घडले?” दुसऱ्याने लिहिले, “ही कार मालकाची चूक आहे.” एका व्यक्तीने लिहिले, “दोनदा नाही, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावे लागेल. बरं ही क्लिप पाहिल्यानंतर तुमचे मत काय आहे? कमेंट मध्ये लिहा.