Viral Video : आई वडील आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. आईवडील मुलांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करतात. ते खूश राहावे, यासाठी सतत प्रयत्न करतात. मुले जसेजसे मोठे होतात तसे आईवडील मुलांविषयी अधिक संवेदनशील होताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडील भावुक होताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना त्यांच्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल.

मुलीच्या पहिल्या वाढदिवशी वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात

हा व्हायरल व्हिडीओ एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चिमुकलीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला मित्र मंडळ आणि नातेवाईकांनी हजेरी लावली आहे. चिमुकलीच्या आईने तिला कडेवर घेतले आहे आणि सर्वांना स्टेजवर उभे राहून हाय करत आहे. स्टेजखाली चिमुकलीचे वडील उभे आहे आणि भावुक झालेले दिसत आहे. चिमुकलीला पाहून वडिलांचे अश्रू अनावर होते. पुढे चिमुकलीच्या आईच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू येतात. त्यानंतर चिमुकलीची वडिल स्टेजवर येतात आणि चिमुकलीला पाहून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही. ते भावुक होतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

aniketowhalofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ या चिमुकलीच्या वडिलांनी शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझा मुलीचा पहिला वाढदिवस. बापरे …किती पटकन मोठी झालीस बाळा. अचानक इमोशनल झालो का ते माहित नाही. कदाचित बाप आणि मुलीचे नाते असेच असेल .तिला डान्स करताना बघून अचानक डोळ्यात पाणी आले. ते आनंदाश्रू म्हणतात ते हेच का ?”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वात मोठ सुख म्हणजे आई – बाप होणं” तर एका युजरने लिहिलेय, “तिच्या रूपाने जग जिंकलयस रे मित्रा..” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा आताच तुम्ही रडलात बर्थडे दिवशी तुमची परी लग्न होऊन सासरी जाईल तर तुम्ही किती रडाल ” एक युजर लिहितो, “भावा एक लक्ष्मी आणि एक भाग्य लक्ष्मी आहे नशीबवान आहेस तू दादा” तर एक युजरने लिहिलेय, “शेवटी बापाचं काळीज आहे”