Viral video: लोकल ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये माय-लेकीनं मिळून एका व्यक्तिला चांगलीच अद्दल घडवली आहे. लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये वारंवार हाणामारी झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. अनेकवेळा या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होऊन हाणामारीही होते.
सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात.व्हिडिओमध्ये एक पुरुष ट्रेनमधील अप्पर सीटवर बसलेला आहे. तिथे असलेली महिला त्या पुरुषाच्या शर्टची कॉलर पकडून त्याला खाली उतरण्यास सांगत असल्याचे दिसते. महिलेची मुलगीही त्या व्यक्तीशी वाद घालताना दिसत आहे. यात महिलेची मुलगी ही त्याला सीटवरुन खाली उतरण्यास सांगत आहे. महिला खूप भडकली असून ती व्यक्तीचं शर्ट सोडायला तयार नाहीये. तर तो व्यक्तीही दोघींशी जोरजोरात भांडताना दिसत आहे. यावेळी हे एकमेकांना शिवीगाळही करताना दिसत आहेत ट्रेनमधील इतर प्रवाशी यांचे वाद पाहत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> विमानाच्या इंजिनमध्ये एकानं नाणं टाकलं; विमान तब्बल ४ तास खोळंबलं, नेटकरी म्हणतात…एकावं ते नवलंच!
ट्रेनमध्ये तुमचं कोणाशी भांडण झालं तर लगेच जीआरपीला कळवावं. कारण या प्रकरणात सर्व अधिकार जीआरपी म्हणजेच गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिसांकडे आहेत. खरं तर जीआरपीचं काम रेल्वे परिसरात सुरक्षा सुनिश्चित करणं हे असतं. याशिवाय रेल्वे परिसरात गस्त घालण्याचं कामही जीआरपी करतं. रेल्वे परिसरात कोणतीही अटक करण्याचा अधिकार फक्त जीआरपीला आहे.