Viral Video : जगात मैत्रीचे नाते हे जगावेगळे असतात. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. मित्र कधीही मदतीला धावून येतात. डोळे पुसायला नेहमी तयार असतात. मित्र आपल्या मैत्रीसाठी काहीही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ढसा ढसा रडणाऱ्या मित्राला धीर देताना त्याचा मित्र दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.

मित्राच्या कुशीत ढसा ढसा रडला

हा व्हायरल व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक मुलगा रेल्वेस्टेशनवरील बाकावर बसून ओक्साबोक्शी रडत आहे. तेव्हा त्याचा मित्र त्याला सावरतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती मित्राला मिठी मारून रडतो आणि मित्र त्याला रडू नको असे म्हणत समजावून सांगताना दिसत आहे. रडण्याचे कारण कळले नाही पण कदाचित रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ असल्याने मित्र सोडून जात असेल किंवा बऱ्याच दिवसांनी परत आला असेल, त्यामुळे तो रडत असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या दोन मित्रांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओवर लिहिलेय, “जिथे रक्ताची नाती कमी पडतात, तिथे मित्र उभे राहतात. शेवटपर्यंत जो नेहमी पाठीशी उभा राहतो, तो मित्र आहे तू माझा”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”शेअर करा त्याला जो नेहमी तुमच्या सोबत राहतो”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मित्रासारखे प्रेम कोणीच देऊ शकत नाही माणूस मनातलं मित्रांजवळ सांगतो” तर एका युजरने लिहिलेय, “सगळ्यांच्या नशिबात असे मित्र नसतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझं या बाबतीत नशीब चांगलं नाही” एक युजर लिहितो, “फक्त स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मैत्री करतात आणि काम झाले की सोडून देतात” तर एक युजर लिहितो, “आईशिवाय जगात कुणी कुणाचं नसतं, पण एक मित्र सगळ्याना पुरुन उरतो तुमच्या चढ उतारात, आयुष्यात तुमच्या पाठीशी खंबीर असतो असा जिवलग मित्र मिळणं म्हणजे नशीब लागतं. तुम्ही किती कंगाल असाल पण असा एकच मित्र तुमची खरी श्रीमंती असतो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.