सापाला पाहून जिथे लोकांना घाम फुटतो , तोच साप घेऊन एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी पाळीव कुत्रा किंवा मांजराप्रमाणे एका महाकाय सापाला गळ्यात लपेटून त्याचे पुन्हा पुन्हा चुंबन घेत आहे. मुलीच्या गळ्यात असा साप लपेटलेलं पाहून तुम्ही सुन्न व्हाल. कोणी हा व्हिडीओ पाहत असेल, त्याला विश्वास बसणार नाही की ती मुलगी खरोखरच खऱ्या सापाशी खेळत आहे.
साप हा असा प्राणी आहे की त्याच्याशी थोडासा खेळ केला तरी जीव जाऊ शकतो. इथे तर या मुलींने गळ्यात साप गुंडाळून त्याचे चुंबन घेतले . बरं, आजच्या जगातही अशी काही माणसं आहेत ज्यांना सापांबद्दल तितकंच प्रेम आहे. सध्या व्हायरल होणारा एक मुलगी आणि सापाचा रोमँटिक व्हिडीओ पाहून तरी हे सांगता येईल.
( हे ही वाचा: त्या लाइव्ह शोमधून शोएब अख्तर अचानक बाहेर का पडला?; Video Viral झाल्यानंतर म्हणाला, “तो प्रकार…” )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मुलीचा आणि सापाचा व्हिडीओ पाहून काही लोकांचे हृदय जोरात धडधडत आहे, तर काहींच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये साप मुलीच्या चेहऱ्याला चिकटलेला दिसत आहे. साप मुलीवर जेवढा प्रेमाचा वर्षाव करत आहे, तेवढीच ती मुलगीही सापाला प्रेमाचा वर्षाव करत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
( हे ही वाचा” Video: एकाच बुक्क्यात गप गार… वृद्ध ग्राहकाला धक्का दिल्याने रेस्टराँमध्ये राडा )
मुलगी सापाला म्हणाली – माझे तुझ्यावर प्रेम आहे!
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जर कोणी डोळे चोळू लागले तर त्याचा दोष नाही. मुलीने तिच्या गालावर सापाला विश्रांती दिली आहे आणि तिला पाळीव कुत्र्याप्रमाणे जीभ बाहेर काढून स्पर्श करायचा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही घाबरून जाल पण मुलगी अजिबात घाबरत नाही. उलट सापाचे लाड करताना ती त्याला सांगत असते – माझे तुझ्यावर प्रेम आहे. सापाला प्रेमाची भाषा मानून सापही त्यावर अजिबात हल्ला करत नाही.