Video Shows Schoolgirl’s reaction : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्टेजवर पर्फोमन्स करताना पोटात गोळा येतो. खूप जणांसमोर डान्स, नाटक किंवा फॅन्सी ड्रेस कार्यक्रमासाठी काही वाक्य बोलायलासुद्धा अनेकांना भीतीच वाटते. कार्यक्रम सुरू असताना आपण चुकलो किंवा एखादे वाक्य बोलायला विसरलो की काय होईल या विचारताच आपण सगळे असतो. पण, कार्यक्रम बघताना कोणी घरातील सदस्य किंवा खास करून आई-बाबा समोर दिसले की थोडा आत्मविश्वास आपल्यात जागा होतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ आई अर्पिता कोवतलने शेअर केला आहे. शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान आईची चिमुकली डान्स सादर करणार असते. ती स्टेजवर सगळ्यात पहिल्या रांगेत उभी असते. आपल्या मुलीचा डान्स सुरू होणार या आनंदात आई व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करते, तर दुसरीकडे चिमुकलीसुद्धा गर्दीत बसलेल्या तिच्या पालकांना शोधत असते. यादरम्यान तिला तिची आई दिसते आणि ती कशी प्रतिक्रिया देते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Ankita Walawalkar and Dhananjay Powar
होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर
Dombivli Viral Video
Dombivli : तिसऱ्या मजल्यावरुन पडूनही एका माणसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला दोन वर्षांचा चिमुकला, डोंबिवलीतल्या देवीपाडा भागातली घटना
Viral Dance Video
‘आरारा खतरनाक…’, ‘उई अम्मा’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

जेव्हा आपल्या मुलांचा एखादा कार्यक्रम असतो, मुलांपेक्षा जास्त पालक यासाठी खूप उत्सुक असतात. सकाळी उठल्यापासून ते त्यांचा पर्फोमन्स होईपर्यंत त्यांच्याही मनात एक भीती असते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एकीकडे चिमुकली डान्स सादर करण्यासाठी तयार असते, तर दुसरीकडे ती तिच्या पालकांचासुद्धा शोध घेत असते. चिमुकलीची आई व्हिडीओ शूट करत असते, तितक्यात चिमुकलीला तिची आई दिसते आणि तिचा चेहरा निर्मळ, निखळ आनंदाने उजळून निघतो. हा खास क्षण तिच्या आईने व्हिडीओद्वारे इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

तिचे डोळे आईवडिलांना शोधत आहेत

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @storiesbytwoplusone या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुम्ही स्टेजवर असता आणि तुम्हाला तुमचे पालक दिसतात’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनासुद्धा हा व्हिडीओ भरपूर आवडला आहे. ‘तिचे डोळे तिच्या आई-वडिलांना शोधत होते, तिच्या प्रतिक्रियेवर एखादा ईमोजी बनवा, मी खूप वेळा हा व्हिडीओ पहिला, क्यूट’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

Story img Loader