Viral Video : प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी सारखी नसते. कुणासाठी प्रेम म्हणजे काळजी आणि जिव्हाळा, तर कुणासाठी प्रेम म्हणजे स्नेह आणि आदर असतो. काही लोकांसाठी त्याग आणि समर्पण भावना म्हणजे प्रेम असते. प्रत्येक व्यक्तीसाठी ही प्रेमाची व्याख्या बदलत असते. नवरा बायको आणि प्रियकर प्रेयसीमधील प्रेम म्हणजे आयुष्यभर एकमेकांची साथ देणे होय. एकमेकांसाठी आयुष्यभर खंबीरपणे सावलीप्रमाणे उभे राहणे होय. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर प्रेम कहाणी दाखवली आहे. हे प्रेम कहाणी ऐकून तुम्हाला खरं प्रेम काय असतं हे दिसून येईल.
या व्हिडीओमध्ये तरुणी सांगते, ” लग्नाच्या एक महिन्यापूर्वी यशवंत(होणारा नवरा) पूर्णपणे पॅरालाइज्ड झाला. सहा वर्षांपूर्वी यशवंत आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो. लग्नाला विरोध होता पण आम्ही दोघेही मिळून लढलो. आमच्या लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी यशवंतला कमी दिसायला लागले. तो हळूहळू त्याची दृष्टी गमावत होता आणि त्याचे संपूर्ण शरीर पॅरालाइज्डचा शिकार झाले. त्याला जीबीएस (GBS) नावाचा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार झाला. त्याच्या शरीरावर ८५ टक्के परिणाम झाला होता. त्याला कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest)चा धोका होता. लोक म्हणाले, लग्न करायच्या आधी विचार कर. पण आम्ही वचन दिले होते की एकमेकांच्या आजारपणात साथ द्यायची. यशवंतने फिजिओथेरेपीचे उपचार सुरू केले. लग्नाच्या काही दिवसापूर्वी यशवंतने पहिले पाऊल टाकले. मला वाटलं आमचं लग्न देवाने स्वत: लिहिलं होतं. आपण प्रत्येक वादळाला धैर्याने तोंड देऊ.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
officialpeopleofindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कठीण काळाने आम्हाला जवळ आणले”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा कहाणींमुळे आपल्याला विश्वास बसतो की खरे प्रेम अजूनही अस्तित्वात आहे
देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो. एकत्र स्ट्राँग राहा.” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरं प्रेम” आणखी एका युजरने लिहिलेय, “पवित्र प्रेम नेहमी जिंकते” एक युजर लिहितो, “असं निभावणारी पत्नी पाहिजे आयुष्यात” तर एक युजर लिहितो, “तुझ्या या कहाणीमुळे माझा पुन्हा प्रेमावर विश्वास बसला”