Viral video: सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजी आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजी- आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात, त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर आजीबाई व्हायरल होत आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो, कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडू न देता या आजीबाईंनी नृत्य केलंय. तसेच सोबत आजोबांनीही ठेका धरत डान्स केला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही तरुणांनी आजींना उचलून एकाच्या खांद्यावर बसवले आणि मग काय आजींनीही उत्साहात डान्स करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर बाकीच्या तरुणांनी आजोबांनीही खांद्यावर बसवत डान्स करण्यास सांगितले. मग सर्वजण उत्साहात अन् आनंदाने डान्स करताना व्हिडिओत दिसत आहेत

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर@TanviPol116027 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजींच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हटलंय, “डान्स केला आजींनी, पण पदर खाली पडू नाही दिला. यालाच तर म्हणतात संस्कार”, तर आणखी एकानं “अशी पिढी पुन्हा होणे नाही..

Story img Loader