Lions Vs Crocodile Video: सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. तर दुसरीकडे पाण्यातील सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे मगर असते. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे, स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. कारण, जंगलात सिंह आणि पाण्यात मगरच राजा असते. पण आता चक्क मगरीशी सिहानं पंगा घेतला आहे. जेव्हा मगर आणि सिंह एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होते…आता असाच या झालेल्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ आफ्रिकेच्या झांबियातील काफू नॅशनल पार्कच्या बुसांगा मैदानांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. मगरीला पाण्यात पकडणे कठीण काम आहे.त्यामुळे सिहांनं आपल्या साथीदाराच्या मदतीनं मगरीला पाण्यातून बाहेर काढून तिच्यावर हल्ला केला आहे. मगर कितीही शक्तिशाली असले तरी सिंहासमोर मगरीने गुडघे टेकले आहे. दहा सिंहानी मगरीची शिकार केली आहे. ही संपूर्ण घटना न्यूटन मुलेंगा नावाच्या टूर गाईडने कॅमेऱ्यात कैद केली आहे, ज्याची क्लिप आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

(हे ही वाचा : Viral Video: धाडसी तरुणाने चक्क किंग कोब्राला केले किस; पाहा हा व्हिडीओ….)

हा व्हिडिओ १.३१ मिनिटांचा आहे. यामध्ये सिंहांचा एक गट मगरीला पकडताना दिसतो. मगरी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडते. पण तो इतक्या सिंहांची ताकद सहन करू शकत नाही आणि एका मिनिटात त्याचा मृत्यू होतो, त्यानंतर सिंह त्याला आपले भक्ष्य बनवतात.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख २२ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दीड हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी हे अत्यंत दुर्मिळ दृश्य असल्याचे म्हटले. हा व्हिडिओ लेटेस्ट साइटिंग्ज या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलाय.