Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या पत्नीसाठी डान्स करत आहे. या तरुणाचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. हा तरुण डान्स द्वारे पत्नीविषयी असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. (video of a husband expressing love for his wife in front of family having such a life partner needs good luck)
कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम
हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही तरुण मंडळी डान्स करताना दिसेल. हे तरुण मंडळी “ओ एक मोढ़ आया, मैं उत्थे दिल छोड़ आया” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या अवतीभोवती काही महिला खाली बसून त्यांचा डान्स बघत आहे. या तरुणांपैकी एक तरुण त्याच्या पत्नीजवळ जाऊन गाण्याचे लिरीक्स म्हणताना दिसतो आणि त्यानंतर तिच्याविषयी प्रेम व्यक्त करत डान्स स्टेप्स असतो. तरुणाचा हा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. कोणालाही वाटेल, “नवरा असावा तर असा” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
silly.edits14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेमात आहे माणूस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरे प्रेम…जो बायकोवर प्रेम व्यक्त करताना कोणाचीही पर्वा करत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. कुठे भेटतात असे नवरे जे सर्वांच्या समोर आपल्या पत्नीविषयी प्रेम व्यक्त करतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशीबवान असतात असे लोक ज्यांना असे नवरे भेटतात.” एक युजर लिहितो, “किती गोड” तर एक युजर लिहितो, “मलाही असाच नवरा पाहिजे” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.