Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ खूप प्रेरणा देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर रुग्णावर उपचार करताना दिसत आहे. जागेवर उभं राहता न येणाऱ्या किंवा जागेवर बसता सुद्धा न येणाऱ्या एका मुलाला सहा महिन्यात डॉक्टर चालायला शिकवते, हा प्रवास या व्हिडीओमध्ये दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगा दिसेल जो बेडवर पडलेला आहे. त्याला नीट चालता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्या शरीराची काहीही हालचाल करता येत नाही. अशा मुलाला एक फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर बरं करण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सहा महिन्यात मुलाला कसे बरे केले याविषयी सांगितले आहे.
व्हिडीओत दाखवलेल्या मुलाला ती उठायला शिकवते, शरीराची हालचाल करायला शिकवते, त्याच्याशी संवाद साधत त्याला बोलके करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या घरच्याच्या मदतीने त्याला चालायला शिकवते. त्याला एक एक पाऊल पुढे चालण्यास शिकवते. त्याला त्यातून बरं करण्याचा प्रयत्न करते. या प्रवासात अनेक भावुक क्षण दिसून येतात. मुलाच्या या सहा महिन्याच्या प्रवासात त्याचे आईवडिल सावलीप्रमाणे त्याच्या बरोबर राहतात. व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की सहा महिन्यानंतर विवेक फक्त चालायला शिकत नाही तर चक्क डॉक्टरच्या पाया पडतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
dr.swati_nandeshwar_physio या फिजियोथेरेपिस्टचे नाव डॉ. स्वाती नंदेश्वर आहे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एकूण ६ महिने अश्रू ढाळले, अखेर मेहनतीचे फळ मिळाले. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ या संकटात ज्या ज्या हातांनी तुला मदत केली आहे त्यांचे उपकार कधी विसरू नको. आयुष्यात तुला कधी काही कमी पडणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “मेहनतीचे फळ मिळाले, एक नंबर भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून डोळ्यात आले पाणी” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.