Viral Video : लहान मुले कधी काय करतील काही सांगता येत नाही. ते काय बोलतील, कसे वागतील याचा काही नेम नाही. तुम्ही आजवर सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी लहान मुलांना डान्स करताना पाहिले असेल तर कधी लहान मुलांना गाणी गाताना पाहिले असेल. कधी खळखळून हसताना पाहिले असेल तर कधी ओक्साबोक्शी रडताना पाहिले असेल पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओ मध्ये एक चिमुकला असं काही करताना दिसतो, की पाहून काही लोकांना किळस येईल तर काही लोकांना मजा येईल. चिमुकला नेमका करतोय का, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. त्याच्या हातात चक्क जिवंत पाल आहे. त्याने एका हाताच्या दोन बोटांमध्ये पाल पकडली आहे आणि त्याचा एक हात खिशात आहे. पालीला हातात पकडून तो हसत हसत खेळताना दिसत आहे. तो पाल घेऊन आईकडे जातो पण तितक्यात त्याचे बाबा त्याला थांबवतात आणि त्याला बाहेर सोडून ये म्हणतात. त्यानंतर चिमुकला हातात पाल पकडून घराबाहेर जाताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. काही लोकांना अवाक् होतील. पालीचं नाव जरी ऐकलं तरी काहींना अंगावर काटा येतो पण या व्हिडीओमध्ये हा चिमुकला चक्क हातात पाल पकडून वावरताना दिसतोय.

पाहा व्हायरल व्हिडीओ (watch Viral video)

mountaineer_lahu_everester या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लहानपणी असे वेडे चाळे केले. मुलाला पाहून स्वतःची लहानपणीची आठवण झाली. हेच वेड कधी प्राणी वाचवण्यासाठी पुढे आले हे समजलेच नाही. निसर्गातील प्रत्येक घटक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गरजेचा आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे.. किती ते धाडस, पाहूनच भीती वाटली मला” तर एका युजरने लिहिलेय, “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ” आणखी एका युजरने लिहिलेय, “बब्या डेंजर आहे. खूप हसलो बब्या आई कडे गेला तेव्हा ” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of a little one caught lizard in his hands and ran to his mother watch the funny viral video ndj