ST Bus Viral Video : एसटी महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवेश करतात. या बसने प्रवास करणे अनेकांसाठी परवडणारा पर्याय असतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडामंडळ (MSRTC) राज्यात विविध मार्गांवर नियमित बस सेवा पुरवते. एसटी महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होतो. जुन्या बसेस, अपुरा ताफा आणि महामंडळाची आर्थिक स्थितीवरून नेहमी प्रश्न विचारले जातात.

अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्कलकोट मार्गावर एका एसटी बसला आग लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून एसटी महामंडळाच्या खालावलेल्या अवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस रस्त्याच्या कडेला थांबली आहे. या बसने पेट घेतला आहे. आग कमी आहे. प्रवासी, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बसमधून खाली उतरत आहे. अग्निशामक सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. वेळेत सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. या बसचा नंबर एमएच २० बीएल ४२१५ असा आहे. बस ही जूनी असून बसची बॉडी सुद्धा खराब आहे. या घटनेने सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

mamdyalanil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुर्डुवाडी आगार मधल्या बसेस सगळ्या भंगार झाल्या , प्रशासनाने लवकर काय तर करावं” तर एका युजरने लिहिलेय, “मी काल तिथून जात होतो, बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “उन्हाळ्याचे दिवस आहेत थोडा वेळ थांबून जावा प्रवासी सुखी घरी पोहोचतील” एक युजर लिहितो, ” बस जुन्या झाल्या आहेत. नवीन बस आणा. महाराष्ट्र सरकार झोप घेत आहे” तर एक युजर लिहितो, “याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे”