Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी हे चिमुकले डान्स करताना दिसतात तर कधी गाणी म्हणताना दिसतात. कधी दंगा मस्ती करताना दिसतात तर कधी हसताना किंवा रडताना दिसतात. पालक सुद्धा आवडीने त्यांच्या मुलांचे व्हिडीओ शेअर करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशाच एका चिमुकलीच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली चक्क स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. फुलवंती या मराठी चित्रपटातील मदनमंजिरी गाण्यावर या चिमुकलीने डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिचे चाहते व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. चिमुकली अतिशय सुंदर रित्या डान्स करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या गोंडस चिमुकलीचा डान्स पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. ही चिमुकली अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटाली मदनमंजिरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आमची मदनमंजिरी”

पाहा व्हायरल व्हिडीओ

विशेष म्हणजे हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की चक्क प्राजक्ता माळीने या चिमुकलीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चिमुकलीचे कौतुक केले आहे.

प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा : याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

_baby_girl_dirba या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही आहे आमची मदनमंजिरी. दोन वर्षाची सुद्धा नाही पण तिने खूप छान डान्स केला, पाहा पूर्ण व्हिडीओ”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या चिमुकलीला ‘छोटी फुलवंती’ संबोधले आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “प्राजक्ता माळी पेक्षा पण भारी आहे ही” तर एका युजरने लिहिलेय, “तिच्या वयाच्या मानाने खूप मस्त नाचली” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात आत्मविश्वास” एक युजर लिहितो, “आई शप्पथ! नजर नको लागायला” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of a one and half year old girl child dance on madanmanjiri song so gracefully video goes viral netizens and actress prajakta mali showers praise ndj