Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी तरुण मराठी गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. पाकिस्तानी तरुणाचे मराठी भाषा आणि मराठी गाण्याविषयीचे प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण एका कारमध्ये बसलेले दिसेल. सुरुवातीला एक तरुण कॅमेऱ्यात बोलतो,
माझं नाव सैफ आहेत आणि मी अबु धाबीमध्ये राहतो. गेल्या व्हिडीओमध्ये मराठी गाण्यांवरती चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर साकीब पुन्हा एकदा दुसरं गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर हा व्हिडीओ आवडला तर शेअर करा लाइक करा”
त्यानंतर दुसरा तरुण जो पाकिस्तानी आहे तो बोलतो. साकिब हा मराठीत बोलतो, “माझं नाव साकीब आहे. मी अबु धाबीमध्ये राहतो. मला मराठी गाणी खूप आवडतात. चला गाऊ या. त्यानंतर तो अजय अतूलचं लोकप्रिय गाणं ‘मागू कसा मी अन् मागू कुणा’ गातो. तो अतिशय मधुर आवाजात खूप सुरेख असं गाणं गातो. त्याचा आवाज ऐकून कोणीही थक्क होईल. सध्या पाकिस्तानी तरुणाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मराठी गाण्याविषयी पाकिस्तानी तरुणाचे प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
saif_dhanshe12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाकिस्तानी तरुण मराठीत गाणं गाताना..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तू पाकिस्तानी असून मराठी गाणं गायल्याबद्दल खूप शुभेच्छा पण आमच्या मराठी माणसांना मराठी बोलण्याची लाज वाटते. त्यांना हिंदी आणि इंग्लिश बोललं की आम्ही खूप सुशिक्षित आहे असं वाटतं” तर एका युजरने लिहिलेय, “कलाकारांची कुठलीच जातं नसते तो फक्त आपल्या कलेशी प्रामाणिक असतो खुप सुंदर आवाज ” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा तुझा आवाज खूप छान आहे..म्हणजे एकदम झकास” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.