सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपल्याला पोट धरुन हसवणारे असतात तर काही अंगावर शहारा आणणारे भयानक असतात. शिवाय काही काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात. सध्या अमेरिकेतील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण येथील एक व्यक्ती कारमधून एका मोठ्या बैलाला घेऊन जाताना दिसत आहे. शिवाय कारमधून बैलाला घेऊन फिरणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बैलाला कारमधून फिरवणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. नॉरफोक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी सकाळी एक कॉल आला होता. यावेळी त्यांना सांगण्यात आलं की, एक माणूस महामार्ग २७५ वर बैलासह कार चालवत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या कारमध्ये बैलाला बसला येईल अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती. पोलिस कॅप्टन चाड रिमन यांनी नेब्रास्का नॉर्थईस्ट या वृत्तवाहिनीला सांगितले की, आम्हाला वाटले की ते लहान वासरू असेल, किंवा लहान प्राणी असेल जो वाहनात बसू शकतो, पण तो एक भलामोठा बैल होता.

हेही पाहा- VIDEO: एयर होस्टेसने ISRO प्रमुखांचे केले जोरदार स्वागत! प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि टाळ्यांचा कडकडाट एकदा पाहाच

व्हिडिओमध्ये हाऊडी डूडी नावाचा महाकाय काळा आणि पांढरा बैल एका छोट्या कारमध्ये बसलेला दिसत आहे. या कारचे छत आणि बाजूच्या खिडक्या काढल्या आहेत. तर या बैलाची मोठी शिंगे कारच्या पुढच्या भागावर झुकल्याचंही दिसत आहे. तर कारच्या दुसऱ्या एका फोटोत बाजूच्या दरवाजाच्या जागी एक लोखंडी रेलिंग दिसत आहे, जी सामान्यत: गुरांच्या गोठ्यात वापरले जाते. दरम्यान, पोलिसांनी वाहन मालकाला बैलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि शहरातून बाहेर जायला सांगितले.

मात्र, या व्यक्तीने चक्क कारमधून बैल फिरवल्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला आहे, ज्यावर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, “मला आश्चर्य वाटते की कारचे स्टीयरिंग कसे असेल?” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, “बैल खूप लाजलेला दिसतोय.” वत्सुई ही एक लांब-शिंगे असलेली, नम्र आधुनिक अमेरिकन पाळीव प्राण्यांची जात आहे. हे पूर्व आणि मध्य आफ्रिकेतील सांगा गुरांच्या जातींच्या अंकोल गटात आढळतात. ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते, इजिप्शियन किंवा हॅमिटिक लाँगहॉर्न म्हणून ओळखले जाणारे ही जनावरे इजिप्शियन पिरॅमिड्सच्या चित्रलिपीमध्ये दिसतात.