Viral Video : सध्याच्या या डिजिटल जगात सर्वकाही ऑनलाइन मिळतं. आर्थिक व्यव्हारसुद्धा ऑनलाईन करता येत असल्यामुळे अनेकांच्या पाकिटात हल्ली पैसे खूप दिसून येते. आज कोणालाही तुमच्याकडे कॅश आहे का, असं विचारावं लागते. गेल्या काही वर्षात भारतीय चलनात बरेच बदल दिसून आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनेक नवीन नोट सादर केले गेले.

तुम्ही कधी २० रुपयांची नवीन नोट पाहिली आहे का? त्या नोटेवर महाराष्ट्रातील एका ठिकाणचे चित्र आहे. आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल तर काही लोकांना कदाचित आज माहिती होईल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण त्या ठिकाणाला भेट देत नोटावरील फोटो दाखवत आहे. (video of a place in maharashtra showcasing on a 20 rupees note do you know video goes viral)

२० रुपयांच्या नोटेवर आहे महाराष्ट्रातील या लोकप्रिय ठिकाणाचे चित्र

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर ऐतिहासिक ठिकाण दिसेल. काही लोक हे ठिकाण लगेच ओळखतील तर काही लोकांना प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमके कोणते? या व्हिडीओमध्ये एक तरुण २० रुपयांच्या नोटावरील इमारतीचा फोटो दाखवतो आणि तीच इमारत तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा दिसते. या ठिकाणचे नाव आहे वेरूळ लेणी आहे. संभाजीनगरपासून २८ किमी वर असलेली ही लेणी पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे. येथील इमारत २० रुपयांच्या नोटवर रेखाटली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

traveller___10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वेरूळ लेणी, संभाजीनगर महाराष्ट्र” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपलं छत्रपती संभाजीनगर” तर एका युजरने लिहिलेय, “वेरूळ लेणी कैलास मंदिर” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला या ठिकाणी जायची इच्छा आहे.” एक युजर लिहितो, “किती सुंदर जागा आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास ३ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Story img Loader