सध्या सोशल मीडियावर बिहारमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाने महिलेला जबरदस्तीने किस करुन तेथून पळून गेल्याचं दिसत आहे. शिवाय ही संतापजनक घटना त्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बिहारच्या जमुई जिल्ह्यातील सदर हॉस्पिटल परिसरातील आहे. तर या ‘सिरियल किसर’ला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना जबरदस्ती किस करणारी एक टोळी होती, ज्यामध्ये एकूण ४ जणांचा समावेश होता. तपासानंतर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत टोळीच्या म्होरक्यासह अन्य ४ जणांना अटक करण्यात आली आहे. महिसौढ़ी बाबू टोला येथून आरोपींना अटक केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. व्हायरल व्हिडीओतील ‘सिरियल किसर’च्या अटकेनंतर पोलिसांनी या टोळीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या टोळीचा म्होरक्या महिसौढ़ी परिसरात राहणारे असून या टोळीत एकूण ४ जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘सिरियल किसर’च्या टोळीचा पर्दाफाश –
हेही पाहा- माणसं नव्हे ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकल्या चक्क टेस्ला कार; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
हेही पाहा- महिलेने ऑर्डर केलेल्या जेवणात आढळला मेलेला उंदीर, रेस्टॉरंटमधील किळसवाणा Video व्हायरल
धक्कादायक बाब म्हणजे ही टोळी दिवसा महिलांची छेड काढायची आणि रात्री चोरी करायची. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्याचे या टोळीच्या म्होरक्याने पोलिसांना सांगितले, मात्र समाजात लाजिरवाण्या भीतीने त्या महिलांनी कोणाकडेही तक्रार केली नाही. या टोळीतील इतर सदस्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण –
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील सदर हॉस्पिटलच्या परिसरात एक महिला फोनवर बोलत असताना अचानक मागून एक तरुण येतो आणि बळजबरीने तिला किस करायला सुरुवात करतो. त्या महिलेने विरोध केला तरीही या तरुणाने तिच्यावर बळजबरी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तरुणाने जबरदस्तीने चुंबन घेतल्यानंतर तो तरुन तेथून पळून गेल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना १० मार्च रोजी घडली असून ती रुग्णालयाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला आणि सोमवारी त्याला अटक केला आहे.