Viral video: हे मार्केटिंगचे युग आहे, सर्व काही विकण्याची कला अवगत असलेला मार्केटचा राजा आहे. म्हणजे ज्याला मार्केटिंग चांगलं माहीत आहे तोच खरा मार्केटचा राजा आहे. अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यासाठी लोक नवीन मार्केटिंग तंत्र शोधतात. अनेक जण ग्राहकांना फसवून आपला व्यवसाय करतात. आजच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूप पैसे खर्च करावे लागतात, त्याशिवाय कामही भागत नाही. काहीतरी वेगळं केलं तरच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात. अहमदनगरमधील सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एका गरम दूध विक्रेत्याने छोटासा बिझनेस जबरदस्त चालण्यासाठी अनोखा जुगाड केलेला आहे. यामुळे आता गरम दूध पिण्यासाठी त्यांच्या गाड्यावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यांनी असं नेमकं केलं तरी काय तुम्हीच पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्हाला एक स्टॉल दिसत आहे. या स्टॉलच्या बाजूला काही व्यक्ती आहेत जे दूध पिण्यासाठी थांबलेले आहेत. शिवाय या काकांकडे काही खाद्यपदार्थही आहेत, जे घेण्यासाठी लोक थांबलेले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहिले तर स्टॉलकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काकांनी जबरदस्त जुगाड कलेला आहे, जो तुम्हाला व्हायरल व्हिडीओत दिसेल. तुम्ही आतापर्यंत या गाड्यांवर वेगवेगळी नावं पाहिली असतील; जसं की, अमृततुल्य, येवले चहा, प्रेमाचा चहा. मात्र, या काकांनी आपल्या गाड्याला ‘आप्पाचा विषय लय हार्ड आहे’ म्हणत अख्खं गाणंच गाड्यावर लावलं आहे.

लावला भन्नाट बॅनर

आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर या काकांनी गाड्यावर एक इलेक्ट्रिक बॅनर लावलेले आहे, ज्यावर ”आप्पांचा विषय लय हार्ड आहे” या गाण्याच्या ओळी दिसून येत आहे. हे पाहून सगळेच या गाड्यावर गर्दी करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चोराची एक कृती अन् मिळाला लाथा बुक्क्यांचा प्रसाद; पर्स चोरताना चोराला कसा पकडला एकदा पाहाच

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ ahmednagar_trends नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “नगरकरांचा नादच खुळा, असा जबरदस्त ट्रेंड दुसरीकडं कुठंच दिसणार नाही”, असं लिहिलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…व्वा, किती भन्नाट मार्केटिंग कौशल्य आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “एकच नंबर, आम्ही रोज पितो दूध.”