Snake hide in hairs video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक साप अशा ठिकाणी अडकून बसला की तुम्ही विचारही करु शकत नाही. एक महिला झोपलेली असताना तिच्या केसात साप फिरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

अनेकवेळा साप लोकांच्या घरात घुसतात, अशा वेळी ते घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण करतात. घरात साप दिसला की पायाखालची जमीन सरकते.  व्हिडीओमध्ये एक महिला दोन्ही हात डोक्यावर ठेवून पालथी झोपलेली दिसते आहे. ही महिला गाढ झोपेत असून तिच्या केसात एक साप फिरताना दिसतोय. केसात लपलेला हा साप डोक्याच्या पाठच्या बाजूला सरपटत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या झोपलेल्या महिलेच्या केसात साप कसा रेंगाळत आहे आणि डोक्याच्या मागच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  सध्या हा व्हिडिओ पाहून लोकांना घाम फुटला आहे. ही महिलाही कदाचीत घाबरल्यामुळे मान खाली घालून झोपली असेल. कारण थोडीशी हालचाल केली तरी काहीही घडू शकतं.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! कासवाच्या शिकारीसाठी मगरीचा घेराव; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

हा व्हिडिओ Kashikyatra नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख २६ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असूनन १ लाख २८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “प्लिज एवढी रीस्क घेऊ नका” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “हा काय वेडेपणा आहे?” सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Story img Loader