प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला किती मोठं नुकसान पोहोचतं हे अनेकदा आपण वाचत आलोय, पाहत आलोय. आपण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या रस्त्याकडेला फेकतो, समुद्रात नद्या नाल्यांत फेकून देतो. प्लॅस्टिकच विघटन व्हायला हजारो वर्षे लागतात तेव्हा हे प्लॅस्टिक हळूहळू पर्यावरण आणि इथे राहणाऱ्या अनेक प्राणी पक्षांच्या ऱ्हासाचं कारण ठरत चाललं आहे. आजही सागरीजीवांच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडत आहेत. गुरंही चारा समजून प्लॅस्टिकच्या पिशव्या खात आहे. तेव्हा प्लॅस्टिक हे निर्सगासाठीच काय पण निर्सगात राहणाऱ्या प्रत्येक घटकाच्या नाशाचं कारण ठरतंय. गोव्यात असाच एक प्रकार पाहायला मिळाला. भक्ष समजून एका सापाने चक्क प्लॅस्टिकची बाटली गिळली. तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना? मग हा व्हिडिओ पाहाच. प्लॅस्टिकची बाटली गिळल्यानंतर हा साप ती बाटली बाहेर काढण्याठी धडपडत होता. अशा विचित्र अवस्थेत असलेल्या सापावर गावकऱ्यांची नजर गेली. त्यांनी या सापाला पाहाताच सर्पमित्राला बोलावून घेतले. शेवटी सर्पमित्र गौतम भगत मदतीला धावून आले. त्यांनी ही प्लॅस्टिकची बाटली बाहेर काढली आणि या सापाचे प्राण वाचवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा