Viral Video : जवान हे आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत:च्या घरापासून किंवा कुटुंबापासून दूर देशाच्या सीमेवर राहतात. आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्यासाठी लढतात, रात्रंदिवस जागतात. जवान हा शब्द ऐकताच आपल्या मनात एक वेगळी भावना निर्माण होते. देशात शांतता व सुरक्षा राखण्याचे खूप महत्त्वाचे कार्य ते करतात. खरं तर जवानाचे जीवन हे खूप कठीण असते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जवानांप्रमाणे त्यांचे कुटुंब खूप मोठा त्याग करतात. कोणी आपल्या मुलापासून तर कोणी आपल्या पतीपासून, कोणी भाऊपासून तर कोणी वडीलांपासून दूर राहतात. जेव्हा ते सुट्टी घेऊन घरी येतात, तेव्हा घरात खऱ्या अर्थाने दसरा दिवाळी साजरी केली जाते. सोशल मीडियावर असे भावुक करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून अश्रू अनावर होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जवान जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याला पाहून त्याच्या पत्नीची काय रिअॅक्शन असते, हे या व्हिडीओमध्ये कैद केले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जवान असलेला तरुण बसलेला दिसेल. त्याच्या अवतीभोवती घरातील लोक जमलेले आहे. तितक्यात त्याची पत्नी तिथे येते आणि त्याला पाहून थक्क होते. तिचा आनंद गगनात मावेनासा असतो पण दुसऱ्याच क्षणी ती पतीला पाहून भावुक होते आणि रडत रडत आत जाते. तिला रडताना पाहून सर्व जण हसतात. तेव्हा तिचा पती तिच्याजवळ मनवायला येतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
muddyachbola या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका फौजीची पत्नी होण एवढं सोप्पी नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नशीब लागत दादा फौजीची बायको व्हायला” तर एका युजरने लिहिलेय, “भाऊ जिंकला आयुष्यात….” आणखी एका युजरने लिहिलेय, “रडू आल राव….” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.