Video of a stone collapsed on an elderly man while flag hoisting: यंदा १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीयांनी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून हा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात भारतभर साजरा केला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपला जीव धोक्यात घातला. त्या वीरांची आठवण आपण या दिनी जरूर करतो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून हा दिवस साजरा केला गेला. अनेक सोसायटी, शाळा, कॉलेज, ऑफिसात या दिवशी ध्वजारोहण करून, तसेच डेकोरेशन करून हा दिवस जल्लोषात साजरा केला गेला. परंतु, यादरम्यान एका शाळेच्या ध्वजारोहणाच्या वेळेस एक अपघात घडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

हेही वाचा… धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

स्वातंत्र्यदिनादिवशी घडलेल्या या प्रकाराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पूर्व माध्यमिक विद्यालय, सेलखडा, मथुरा येथे ध्वजारोहण करताना वरून एक दगड खाली कोसळला आणि एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावर पडला. दगडाचा मार लागताच तो वयोवृद्ध खाली कोसळला. हे पाहून आजूबाजूची मंडळी थोडी घाबरली.

हा व्हिडीओ ‘ek.ajnabi___’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसंच “सरपंच जी, अब कभी झंडा नहीं फहराएंगे” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… पतीच्या प्रकृतीमुळे घेतला ‘हा’ धाडसी निर्णय, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या महिला कॅब ड्रायव्हरची प्रेरणादायी गोष्ट

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments on Video)

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. काहींनी ही घटना हसण्यावारी नेली तर काहींनी यामुळे तिरंग्याचा अपमान झाला आहे असे म्हणून संताप व्यक्त केला आहे. काहींनी वयोवृद्धाला लागलं ते फार वाईट झालं, अशा स्वरात काळजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा… धावत्या ऑटोमागे स्केटिंगने केला स्टंट अन्…; तीन अल्पवयीन मुलांचा VIRAL VIDEO

दरम्यान, सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. या धक्कादायक घटनेने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Story img Loader