School Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यावर शाळेच्या दिवस आठवतात. काही व्हिडीओ तर अगदी भावुक करणारे असतात. शाळा, वर्गखोल्या, शाळेतील शिक्षक, मित्र मैत्रीणी हा आपल्या शाळेच्या आठवणीतला खजिना आहे. ते दिवस कधीही परत येत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गुरुजी विद्यार्थ्यांना कवी सुरेश भटांची सुंदर कविता गात शिकवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवतील.

गुरुजींनी सुमधुर आवाजात विद्यार्थ्यांना शिकवली सुरेश भटांची कविता

हा व्हायरल व्हिडीओ एका वर्गखोलीतील आहे व्हिडीओमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे आणि विद्यार्थी मन लावून गुरुजीचे ऐकताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गुरुजी कवी सुरेश भटांची अप्रतिम अशी लोकप्रिय कविता “गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.” गात विद्यार्थ्यांना शिकवत आहे. गुरुजी अत्यंत ताला सुरात आणि सुमधुर आवाजाने विद्यार्थ्यांसमोर कविता गाऊन दाखवत आहे. ही कविता ऐकल्यावर तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

ramprasad_umbare_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्हाला शाळेत होती ही कविता जुने दिवस आठवले” तर एका युजरने लिहिलेय, “डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा उभा केलात सर तुम्ही. खुद्द भटांना सुद्धा आज या रचनेचा अभिमान वाटला असेल” एक युजर लिहितो, “प्रत्येक शिक्षकाने याचप्रमाणे कविता शिकवल्या तर विद्यार्थी कधीही कविता विसरणार नाही.खूप छान सर” तर एक युजर लिहितो, “किती वेळ ऐकली तरी ऐकतच रहावी .खूप छान”