Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या पवित्र नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. दोन व्यक्ती लग्नानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात नेहमी सोबत असतात. अशा या सुंदर नात्यातील गोडवा आणि प्रेम वयानुसार वाढत जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर नवरा बायकोच्या नात्यावर आधारीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ महाकुंभमेळ्यातून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल नवरा महाकुंभमेळ्यात कुंभस्नान करण्यासाठी येऊ शकला नाही म्हणून बायकोने असं काही केलं की तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (video of a wife dipped her mobile phone in water five times to give Kumbh snan to her husband at mahakumbh mela funny video goes viral on social media)

नवऱ्याला कुंभस्नान घडविण्यासाठी बायकोने पाच वेळा पाण्यात बुडवला मोबाईल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की महाकुंभमेळ्यात आलेली एक पत्नी तिच्या नवऱ्याला व्हिडीओ कॉल करते आणि व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्याच्याबरोबर बोलता बोलता नदीपात्रात उतरते. त्यानंतर पुढे असं काही करते की कोणालाही धक्का बसेल. ती नवऱ्याला कुंभस्नान करता यावे, म्हणून चक्क तिचा फोन पाच वेळा पाण्यात बुडवते. हे पाहून कोणालाही धक्का बसेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (viral Video)

the.sarcastic.house या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असं प्रेम करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मोबाईल वॉटर प्रुफ करा” तर एका युजरने लिहिलेय, “अभिनंदन, तुझ्या नवऱ्याची सर्व पापं धुतली” आणखी एका युजरने लिहिलेय, “वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है” एक युजर लिहितो, “मोबाईलला मोक्ष मिळाले” तर एक युजर लिहितो, “खरंच प्रेम आंधळं असतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.