Viral Video : लग्नानंतर एका मुलीला सासरी अनेक नवी लोक भेटतात. या लोकांबरोबर नवीन नाती जुळतात. नवरा, सासू सासरे याशिवाय, दीर, नणंद, जाऊबाई इत्यादी. पण या सर्व नात्यांमध्ये नणंद भावजय हे खूप जवळचं नातं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी आणि सुंदर मैत्री दिसून येते. नणंद ही घरात सर्वांच्याच लाडाची असते. चार दिवसासाठी पाहुणी म्हणून माहेरी येते पण तिच्यामुळे संपूर्ण घर स्वर्ग वाटते. सध्या या नणंदवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नणंद म्हणजे काय असते, याविषयी एक महिला कविता सादर करताना दिसतेय.
या व्हिडीओमध्ये एक महिला कविता सादर करते,
“नणंद म्हणजे काय असतं
नणंद म्हणजे काय असतं..
वहिनी वहिनी म्हणत सभोताली गजबजणारं गाव असतं..
नणंद म्हणजे काय असतं..
बोबड्या शब्दात अतिउत्तम म्हणवून घेणारं हरपलेलं भाव असतं..
नणंद म्हणजे काय असतं…
आपल्या माहेरला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून प्रार्थना करणारं नाव असतं..
नणंद म्हणजे काय असतं..
भावाची बाहूली, आईवडिलांची सावली
मित्रांची थोड्या वेळची माऊली आणि माहेरचा भाग असूनही परकी म्हणून उमटलेलं एक घाव असतं..
नणंद म्हणजे काय असतं…”
हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या नणंदबाईची आठवण येईल. काही महिला नणंद बाईवरील ही कविता ऐकून भावुक होतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
official_monika_ashtekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माहेरसाठी प्रार्थना करणारं नाव असतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नणंद छोटी असेल तर मैत्रीण असते” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान हृदयाला भिडले”
आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी बेस्ट फ्रेंड माझी नणंद आहे” एक युजर लिहिते, “मला तर तीन नणंदा आहेत तिघीही इतक्या चांगल्या आहेत की शब्दात सांगू शकत नाही .मला तर वाटतं जगात कोणाच्या नणंदा इतक्या चांगल्या नसतील तितक्या चांगल्या माझ्या तिघीही नणंदा आहेत . मोठी तर मला माझ्या आई प्रमाणे जीव लावते ,मधली तर एक मैत्रीणच अगदी, आणि छोटी नणंद तर माझ्या पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे पण ती मला माझ्या लहान बहिणी प्रमाणेच. १० वर्ष झालीत माझ्या लग्नाला पण आमचं नातं जणू काही नवीनच इतक्या गोड आहेत माझ्या नणंदा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी ही कविता ऐकून त्यांनी नणंदबरोबरच्या नात्याविषयी सांगितले.