Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून खळखळून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अश्रु थांबत नाही. काही व्हिडीओ असे असतात जे आपल्याला प्रेरणा देतात, नवीन काहीतरी शिकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पोलीस अधिकारी बनला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
दरवर्षी हजारो मुले स्पर्धा परिक्षेला बसतात त्यातील काही ठराविकच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. काही पोलीस अधिकारी बनतात आणि आपले स्वप्न पूर्ण करतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण पोलीस उपअधीक्षक बनला आहे. सर्व जण उत्साहाने त्याने मिळवलेले यश साजरे करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण त्याच्या मित्राला मिठी मारून ढसा ढसा रडताना दिसतो. मेहनतीचे फळ मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. त्याचे मित्रमंडळ मिरवणूक काढतात. त्याला गुलालाने माखतात, त्याच्या गळ्यात हार घालतात. या क्षणी पोलीस उपअधीक्षक झालेला तरुण मात्र भावुक होताना दिसतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “सात वर्षाचा संघर्ष आज संपला. २९ मेन्स, सात मुलाखती अन् शेवटी घेतली ड्रिम पोस्ट DYSP. भावासाठी एक लाइक”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
mpsc_studentt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संघर्ष रडवतो पण एक दिवस नक्की घडवतो” तर एका युजरने लिहिलेय, “बापाला दिलेला शब्द पूर्ण करायचं … मग त्यासाठी जीव गेला तरी चालेल…” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ सलाम. हे तुझ्या या जिद्दीला. खरंच यार इतके वर्ष आणि इतके वेळेस यश मिळाले नाही तरी धीर नाही सोडला. शेवटी देवाने पण हार मानली भाऊ तुझ्या पुढे. ते म्हणतात ना संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. शेवटी भावाने त्याचे स्वप्न पूर्ण केलं…खरंच मनापासून अभिनंदन भाऊ तुला.” एक युजर लिहितो, “जिंकलास भावा..” तर एक युजर लिहितो, “भावा तुझी मेहनत,कष्ट आणि चिकाटी होती” अनेक युजर्सनी या तरुणाचे अभिनंदन केले आहे.