Viral Video : ग्रंथालय म्हणजे विविध प्रकारची माहिती पुस्तक लेख चित्र इत्यादी द्वारे एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. आजवर तुम्ही अनेक ग्रंथालयाला भेट दिली असेल. सार्वजानिक ग्रंथालय, शालेय किंवा महाविद्यालयीन ग्रंथालयात गेले असतील पण तुम्ही कधी इतक सुंदर ग्रंथालय पाहिलं का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याने घरी तयार केलेले ग्रंथालय दाखवत आहे. हे ग्रंथालय पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो त्याने घरी तयार केलेले ग्रंथालय दाखवत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला एखाद्या झोपडीसारखे घर दिसेल पण जेव्हा तुम्ही त्या झोपडीमध्ये जाणार, तेव्हा तुम्हाला एक सुंदर ग्रंथालय दिसेल. या तरुणाने वहीच्या पानांवर माहिती लिहिली आहे. आणि ही पाने भिंतीवर लावलेली आहे. या ग्रंथालयात एक टेबल आहे. त्यावर भगवान बुद्धांची मूर्ती आहे. तसेच छावा आणि बहिर्जी ही दोन लोकप्रिय पुस्तके ठेवलेली आहे. त्याबरोबर एक वृत्तपत्र सुद्धा आहे. या ग्रंथालयात थोर पुरुषांची चित्रे, पोस्टर, नकाशे, नोट्स सुद्धा लावलेल्या आहेत. हे ग्रंथालय एवढे सुंदर दिसत आहे की तुम्हालाही येथे भेट द्यावी वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “अभ्यास करण्यासाठी एसी आणि कंपार्टमेंटचे ग्रंथालय असावे लागत नाही फक्त जिद्द आणि मेहनत पाहिजे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
raje_sambhaji_academy_akot या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगातील सर्वात सुंदर ग्रंथालय पाहिलं का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांवर पुढे चालतो आहे मित्रा, आयुष्यात हाल होतील, पण हार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “डॉ बाबासाहेब आंबेडकर ही विचार शक्ती आहे जीवन जगण्याची प्रेरणा देते तर जिद्द सोडायची नाही लगे रहो जय भीम भाऊ” आणखी एका युजरने लिहिलेय, “या कष्टाच फळ नक्कीच आयुष्यभर गोडवा देईल” एक युजर लिहितो, “जिद्द असेल तर ग्रंथालय कधीही तयार होते” तर एक युजर लिहितो, “मन जिंकलास भावा”